ठळक मुद्देकरणने सांगितले आहे की, मी काही वर्षांपूर्वी मानसिक तणावातून गेलो होतो. मी अनेक दिवस डिप्रेशनमध्ये होतो. या सगळ्यातून मला बाहेर पडण्यासाठी बिपाशाने मदत केली.

करण सिंग ग्रोव्हरचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय बनले आहे. कारण त्याने आतापर्यंत तीन लग्नं केली असून त्याच्या तिन्ही पत्नी या अभिनेत्री आहेत. त्याचे पहिले लग्न श्रद्धा निगमसोबत दुसरे जेनिफर विंगेट आणि तिसरे लग्न बिपाशा बासूसोबत झाले आहे. करणचे या तीन अभिनेत्रींसोबतच निकोल अल्वरस या कोरिओग्राफरसोबत देखील नाव जोडण्यात आले होते. झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या वेळी त्या दोघांच्या नात्याची चांगलीच चर्चा झाली होती. त्याचसोबत अभिनेत्री बरखा बिष्टसोबत त्याचा साखरपुडा देखील झाला होता.

करण सिंग ग्रोव्हर सध्या त्याच्या आयुष्यात बिपाशा बासूसोबत प्रचंड खूश असून तो काही वर्षांपूर्वी डिप्रेशनमध्ये होता अशी त्यानेच नुकतीच कबुली दिली आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत करणने सांगितले आहे की, मी काही वर्षांपूर्वी मानसिक तणावातून गेलो होतो. मी अनेक दिवस डिप्रेशनमध्ये होतो. तुमच्या आयुष्यात डिप्रेशन कोणत्याही कारणामुळे येऊ शकते. केवळ याचे मूळ काय आहे हे शोधणे सगळ्यात गरजेचे आहे. माझ्यासाठीच नव्हे तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांसाठी तो अतिशय वाईट काळ होता. पण त्या परिस्थितीत देखील ते माझ्या पाठिशी उभे राहिले. या सगळ्यातून मला बाहेर पडण्यासाठी बिपाशाने मदत केली. मी आजवर यावर कधीच बोललो नव्हतो. पण यावर बोलणे गरजेचे आहे असे मला वाटते. आपण सगळेजण आयुष्यात कोणत्या ना कोणत्या समस्यांना तोंड देत असतो. आपण कोणत्या ना कोणत्या तणावाखाली असतो. पण आयुष्यात असा तणाव घेण्यात काहीच अर्थ नाही. आयुष्यात यापेक्षा देखील अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 

करण सिंग ग्रोव्हरने अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केला असून कसौटी जिंदगी कीच्या नव्या पर्वात या प्रसिद्ध मालिकेत तो मिस्टर बजाज या भूमिकेत प्रेक्षकांना दिसत आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना आवडत आहे. विशेष म्हणजे कसौटी जिंदगी या मालिकेच्या पहिल्या पर्वात तो प्रेरणाच्या जावयाच्या भूमिकेत दिसला होता. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Karan Singh Grover says Bipasha Basu helped him beat depression: ‘It has been a difficult journey’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.