ठळक मुद्देअंकिताने 14 डिसेंबरला एका क्यूट मुलीला जन्म दिला असून करणनेच ही गुड न्यूज मीडियाला दिली आहे. त्याने मीडियाशी बोलताना सांगितले आहे की, मी खूप खूश असून मला काय बोलायचे हेच सुचत नाहीये.

छोट्या पडद्यावरील मोस्ट पॉप्युलर कपल करण पटेल आणि अंकिता भार्गवच्या घरी एका नन्ही परीचे नुकतेच आगमन झाले आहे. अंकिताने 14 डिसेंबरला एका क्यूट मुलीला जन्म दिला असून करणनेच ही गुड न्यूज मीडियाला दिली आहे. त्याने मीडियाशी बोलताना सांगितले आहे की, मी खूप खूश असून मला काय बोलायचे हेच सुचत नाहीये. अंकिता आणि आमच्या बाळाची तब्येत चांगली आहे. आमच्या कुटुंबियांच्या नेहमीच पाठिशी उभे राहिल्याबद्दल मी माझ्या फॅन्सचे आभार मानतो. 

करणने कहान घर घर की, कसौटी जिंदगी की, केसर, काव्यांजली, करम अपना अपना यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही ये है मोहोब्बते या मालिकेमुळे मिळाली. तो नुकताच खतरों के खिलाडी या मालिकेत देखील झळकला होता. करणप्रमाणेच अंकिता देखील अभिनेत्री आहे. तिने केसर, देखा एक ख्वाव आणि रिपोर्टस यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ये है मोहब्बते' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. आता या मालिकेचे निर्माते या मालिकेचा दुसरा सीझन ये है चाहते घेऊन येणार आहेत. याचा फर्स्ट प्रोमोदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र ये है मोहब्बते मालिकेचे प्रेक्षक खूप नाराज झाले आहेत. तर कलाकारदेखील नर्व्हस झाले आहेत. ये है मोहब्बते मालिकेत दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल मुख्य भूमिकेत होते. ही मालिका निरोप घेणार असल्याचे समजल्यामुळे करण पटेल खूप उदास झाला होता. त्याने स्वतः सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली होती. 

करणने त्याचा दिव्यांकासोबतचा फोटो शेअर करत या मालिकेतील सर्व कलाकार आणि टीमचे आभार मानले होते. करणने लिहिले होते की, प्रत्येक चांगली गोष्ट एक दिवस संपते. आता ये है मोहब्बते मालिकेची निरोप घेण्याची वेळ आली आहे. माझ्यासाठी ही फक्त मालिका नाही. माझ्यासाठी घर आहे. जिथे माझे कुटुंब आणि मित्रमंडळी आहेत. या मालिकेमुळे अली, अभिषेक, संग्राम आणि राज सारखे भाऊ मला मिळाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या खऱ्या आयुष्यातील सासऱ्यांची या मालिकेमुळे भेट झाली. 

Web Title: Karan Patel, Ankita Bhargava Welcome Baby Girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.