टीव्ही अभिनेता करण कुंद्रा Karan Kundrra) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत आहे. 2020मध्ये करणचे गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अनुषा दांडेकरसोबत (Anusha Dandekar) ब्रेकअप झालं. ज्याची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली होती. त्याचवेळी अनुषाने करणवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. करण कुंद्रा यांनी बर्‍याच दिवसानंतर या संपूर्ण प्रकरणावर आपलं मौन सोडलं आहे.

एका मुलाखती दरम्यान करण म्हणाला की, 'मी इतका वेळ शांत बसलो कारण मला माझ्या नात्याबद्दल असलेला आदर कायम ठेवायचा होता. मी बर्‍याच  गोष्टी सांगू शकलो असतो पण मी तसं केलं नाही. तिने (अनुषा)  जे काही सांगितले तो तिचा दृष्टिकोन होता. कधीकधी मला बोलणं ऐकून हसू येतं. एखाद्या व्यक्तीला दुसर्‍या व्यक्तीबद्दल इतका द्वेष कसा असू शकतो हे मला माहित नाही. आम्ही दोघांनी साडेतीन वर्षे सुंदर नातं शेअर केलं. '

करण कुंद्रा पुढे म्हणतो, 'मी अनुषाकडून बरेच काही शिकलो आहे. पण जेव्हा मी माझ्या करिअरमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे तेव्हा माझ्यावर असे आरोप का केले जात आहेत? मी ज्या व्यक्तीसोबत एक सुंदर नात्यात होतो, तिच माझ्यावर इतके गंभीर आरोप कसे करु शकते?, आम्ही दोघांनी या नात्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. करणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनुषा दांडेकर जेसन शाहला डेट करते आहे. तिने त्याच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर केला होता. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: karan kundra finally breaks his silence on break up with anusha dandekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.