kapil sharmas wife ginni is pregnant with second child | कपिल शर्मा दुसर्‍यांदा होणार बाबा, पत्नी गिन्नी पुन्हा प्रेग्नंट?

कपिल शर्मा दुसर्‍यांदा होणार बाबा, पत्नी गिन्नी पुन्हा प्रेग्नंट?

ठळक मुद्देछोटा पडदा गाजवल्यानंतर कपिल शर्माने सिनेमात एंट्री केली होती. मात्र सिनेमात त्याला फारसे यश मिळाले नाही. आता कपिलने आपला मोर्चा डिजीटील क्षेत्राकडे वळवला आहे.

कॉमेडियन कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. होय, कपिल दुस-यांदा बाबा बनणार असल्याचे कळतेय. कपिलची पत्नी गिन्नी दुस-यांदा प्रेग्नंट आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गिन्नी प्रेग्नंट असून जानेवारी 2021 मध्ये ती दुस-यांदा आई बनेल. कपिल व गिन्नी यांना अमायरा नावाची एक मुलगी आहे. गेल्या वर्षी 10 डिसेंबरला अमायराचा जन्म झाला होता. येत्या 10 डिसेंबरला अनायरा एक वर्षाची होणार आहे.

अलीकडे कपिलची मैत्रिण भारतीने करवाचौथच्या दिवशी इन्स्टा लाईव्ह केले होते. या व्हिडीओ गिन्नीचीही एक झलक दिसली होती आणि व्हिडीओत गिन्नीचा बेबी बम्प स्पष्ट दिसला होता.

दिवाळीच्या दिवशी कपिलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. यात मात्र गिन्नी बेबी बम्प लपवताना दिसली होती. कपिल व गिन्नी येत्या 12 डिसेंबरला लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करतील. 12 डिसेंबर 2018 रोजी दोघांचे लग्न झाले होते.

छोटा पडदा गाजवल्यानंतर कपिल शर्माने सिनेमात एंट्री केली होती. मात्र सिनेमात त्याला फारसे यश मिळाले नाही. आता कपिलने आपला मोर्चा डिजीटील क्षेत्राकडे वळवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कपिल शर्मा लवकरच एका वेबसीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन सुरूवात करणार आहे. मात्र कपिलच्या या प्रोजेक्टबद्दल अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
अलीकडे कृष्णा अभिषेकने  कपिलच्या या प्रोजेक्टबद्दल संकेत दिले होते. कपिल शर्मा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन सुरूवात करण्यासाठी 20 कोटी रुपये मानधन घेत असल्याचे कृष्णाने सांगितले होते. अर्थात हे त्याने मस्करीत म्हटले की, यात काही तथ्य आहे, हे लवकरच कळेल.

ते ‘महाभारत’ विसरलेत का? ‘कपिल शर्मा शो’वरून मुकेश खन्ना-गजेंद्र चौहान यांच्यात जुंपली

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kapil sharmas wife ginni is pregnant with second child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.