बॉलिवूड कलाकारांच्या लाइफस्टाईलबाबत नेहमीच चर्चा होत असते. त्यांच्या लक्झरी कार्ससोबतच त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनबाबतही त्यांच्या चाहत्यांना बघायचं असतं. बॉलिवूड कलाकारांच्या या व्हॅनिटी व्हॅन इतक्या आलिशान असतात की, त्या जणू एखाद्या ५ स्टार हॉटेलच्या रूमसारख्या. कपिल शर्माची व्हॅनिटी व्हॅनदेखील खूप लक्झरी आणि आलिशान आहे.

कपिल शर्माने बॉलिवूडमध्ये कॉमेडियन म्हणून ओळख बनवली आहे. तो एक चांगला सिंगरदेखील आहे. त्याने कॉमेडी जगतात एक नवीन ट्रेंड सेट केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कपिल शर्माची व्हॅनिटी व्हॅन शाहरूख खानच्या व्हॅनपेक्षाही महागडी आहे. या व्हॅनिटी व्हॅनची किंमत ५ .५  कोटी इतकी आहे.

कपिल शर्माने त्याच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो शेअर केले होते. त्याने सांगितले होते की त्याच्या व्हॅनची डिझाईन डीसीने केली आहे. त्याच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटोदेखील खूप व्हायरल झाले होते. त्याची ही व्हॅन बॉलिवूडमधील सर्वात महागडी व्हॅनिटी व्हॅन आहे.

मागील काही वर्षांत कपिल शर्माने खूप प्रगती केली आहे आणि याचा अंदाज तुम्ही त्याची लाइफस्टाईल पाहून लावू शकता. टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, कपिल मुंबईतील एका घराचा मालक आहे, ज्याची किंमत 15 कोटी रुपये आहे. तसेच त्याच्याकडे मर्सिडिज, रेंज रोवर आणि व्होल्वो एक्ससी या महागड्या गाड्यादेखील आहेत. या व्यतिरिक्त पंजाबमध्ये त्याचा बंगला आहे ज्याची किंमत 25 कोटी रुपये आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार कपिल शर्मा एका शोसाठी जवळपास 60 ते 80 लाख रुपये घेतो. तसेच काही मीडियाचा हा दावा आहे की गेल्या काही महिन्यात त्याच्या मानधनात 20 ते 30 टक्के घट झाली आहे.

द कपिल शर्मा या शो व्यतिरिक्त कपिल स्टेज शोमधून खूप मानधन कमवितो. दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार कपिल शर्मा एका लाइव्ह शोसाठी जवळपास 75 लाख रुपये मानधन घेतो.

Web Title: Kapil Sharma's vanity van is more luxurious than a 5 star hotel TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.