kapil sharma spotted at airpor on wheelchair open up about reason | कपिल शर्माला का घ्यावा लागला व्हिलचेअरचा आधार? स्वत: सांगितले कारण

कपिल शर्माला का घ्यावा लागला व्हिलचेअरचा आधार? स्वत: सांगितले कारण

ठळक मुद्देकाल मुंबई एअरपोर्टवर व्हिलचेअरवर बसलेल्या कपिल शर्माचे फोटो व्हायरल झालेत, तसाच त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला.  

कॉमेडियन कपिल शर्मा काल मुंबई एअरपोर्टवर दिसला आणि त्याला पाहून अनेकांना धक्काच बसला. होय, व्हिलचेअरवर बसून कपिल एअरपोर्टच्या बाहेर आला. व्हिलचेअरवर बसलेल्या कपिलचे फोटो क्षणात व्हायरल झालेत.  यानंतर अनेक चाहत्यांनी त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. कपिलला व्हिलचेअरचा आधार का घ्यावा लागला? त्याला नेमके झाले तरी काय? हे मात्र कळायला मार्ग नव्हता. पण आता खुद्द कपिलनेच याचा खुलासा केला आहे.

होय, स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत त्याने यामागचे कारण सांगितले. मी ठीक आहे. फक्त पाठीला दुखापत झाली आहे. यामुळे मला व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला, असे कपिलने यावेळी सांगितले. कपिलला स्लिप डिस्कची समस्या आहे. काही वर्षांआधी या त्रासामुळे त्याला काही महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागला होता.

पत्रकारांनावर भडकला...

काल मुंबई एअरपोर्टवर व्हिलचेअरवर बसलेल्या कपिल शर्माचे फोटो व्हायरल झालेत, तसाच त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला.  या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा एका व्हील चेअरवर बसलेला असून त्याला ढलकत ढकलत पार्किंगच्या दिशेने नेण्यात येत आहे. यावेळी कॅमेरामन आणि फोटोग्राफर्स कपिलचा व्हिडिओ शूट करतात. मात्र, कॅमेरामन यांनी केलेला पाठलाग कपिलला अजिबात रुचत नाही.  उल्लू के पठ्ठो असे म्हणत कपिल फोटोग्राफर्सशी उद्धटपणे वर्तन करतो. विशेष म्हणजे हे कॅमेºयात शूट झालेय,हे लक्षात आणून दिल्यानंतरही, ओये हटो पिछे सारे तुम लोग, तुम लोग बत्तमिजीयाँ करते हो.. असे कपिल म्हणतो.
कपिलच्या उद्धटपणावरुनही अनेकांनी कपिलला सुनावले आहे. तर, काहींनी कपिलच्या विमानातील हरकींच्या आठवणही जाग्या केल्या आहेत. दुसरीकडे, कपिलचा हा अवतार पाहून त्याच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kapil sharma spotted at airpor on wheelchair open up about reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.