the kapil sharma show on the set video shared on Sony instagram page PSC | द कपिल शर्मा शोच्या सेटवर शूटिंग सुरू होण्यापूर्वी असते असे वातावरण, पाहा हा व्हिडिओ

द कपिल शर्मा शोच्या सेटवर शूटिंग सुरू होण्यापूर्वी असते असे वातावरण, पाहा हा व्हिडिओ

ठळक मुद्देसोनी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आपल्याला सेटवरच्या कधीही पाहायला न मिळालेल्या गोष्टी पाहायला मिळत आहेत.

द कपिल शर्मा शो ची लोकप्रियता प्रचंड असून हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्ये नेहमीच अव्वल असतो. द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे.

द कपिल शर्मा शोच्या सेटवरचे वातावरण कसे असते हे नुकतेच एका व्हिडिओच्या द्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यामागे किती लोकांची मेहनत असते हे या व्हिडिओद्वारे आपल्याला कळत आहे. सोनी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आपल्याला सेटवरच्या कधीही पाहायला न मिळालेल्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओत आपल्याला अर्चना पुरण सिंग दिसत असून ती या व्हिडिओत सेटच्या मागे असलेल्या एका छोट्याशा मंदिरात पाया पडत असताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर एका छोट्याशा गल्लीतून ती सेटवर पोहोचते. सेटवर पोहोचल्यानंतर ती तिथे उपस्थित असलेल्या क्रू मेंबर्स आणि प्रेक्षकांसोबत ती गप्पा मारते. 

देवी या लघुपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री काजोलने हजेरी लावली त्यावेळेचे हे चित्रीकरण असून अर्चना या लघुपटाचे निर्माते निरंजन अय्यंगर यांच्यासोबत गप्पा मारताना दिसत आहे. त्यानंतर या लघुपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेले काजोल, नीना कुलकर्णी, शिवानी रघुवंशी, श्रुती हासन, यशस्विनी दायमा यांना आपल्याला पाहायला मिळत आहे. काजोल आणि अर्चना यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्याचे या व्हिडिओत आपल्याला दिसत आहे. 

या व्हिडिओत शिवानीची मी फॅन असल्याचे अर्चना सांगत आहे तर त्यांच्या मागच्या बाजूला कार्यक्रमाचे टीम चित्रीकरणाची तयारी करत असल्याचे दिसत आहे तर काजोल तिच्या देवीच्या टीमसोबत सेल्फी काढण्यात बिझी आहे. तसेच आपल्याला या व्हिडिओत कृष्णा अभिषेक देखील दिसत आहे. तसेच अर्चना हातात स्क्रिप्ट घेऊन वाचत असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. 

Web Title: the kapil sharma show on the set video shared on Sony instagram page PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.