रणबीर दिसतो लय भोळा, वाचा त्याचा अतरंगी कारनामा; बहिणी रिद्धिमाने केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 11:31 AM2021-09-02T11:31:45+5:302021-09-02T11:33:17+5:30

The Kapil Sharma Showचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे आणि या प्रोमोमध्ये रिद्धिमा आपल्या भावाची म्हणजेच रणबीर कपूरची पोलखोल करताना दिसतेय.

the kapil sharma show riddhima kapoor reveals ranbir kapoor gave her clothes to his girlfriends | रणबीर दिसतो लय भोळा, वाचा त्याचा अतरंगी कारनामा; बहिणी रिद्धिमाने केली पोलखोल

रणबीर दिसतो लय भोळा, वाचा त्याचा अतरंगी कारनामा; बहिणी रिद्धिमाने केली पोलखोल

Next
ठळक मुद्देनीतू आणि रिद्धिमा कपूरचा हा एपिसोड येत्या रविवारी सोनी टीव्हीवर पाहायला मिळणार आहे.

छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये येत्या आठवड्यात कोण पाहुणे येणार आहेत? तर कपूर घराण्यातील दोन सदस्य.  होय, येत्या आठवड्यात नीतू कपूर  (Neetu Kapoor) आणि त्यांची लाडकी लेक रिद्धिमा कपूर (Riddhima Kapoor Sahni) कपिलच्या शोमध्ये गेस्ट म्हणून येत आहेत. शोमध्ये पहिल्यांदाच ही मायलेकीची जोडी दिसणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. तूर्तास शोचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे आणि या प्रोमोमध्ये रिद्धिमा आपल्या भावाची म्हणजेच रणबीर कपूरची पोलखोल करताना दिसतेय.
रिद्धिमा साहनी हिने  ‘द कपिल शर्मा शो’चा नवा प्रोमो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे.  या प्रोमोमध्ये मायलेकी कपिलसोबत मिळून धम्माल करत आहेत. 

या प्रोमोमध्ये कपिल रिद्धिमाला विचारतो, की हे खर आहे का, जेव्हा तू लंडनमध्ये शिकत होतीस तेव्हा रणबीर तुझ्या वस्तू न विचारता कोणाला तरी भेट करत होता?  यावर उत्तर देतांना रिद्धिमाला हसू आवरत नाही. ती होकारार्थी मान हलवते आणि मग  भावाचा अतरंगी कारनामा सांगू लागते. ती सांगते,‘हो, मी तेव्हा लंडनमध्ये शिकत होते. एकदा मी घरी आले तेव्हा, रणबीरची एक मैत्रिण मला भेटायला घरी आली होती. ( रिद्धिमा रणबीरची एक मैत्रिण म्हणताच, नीतू तिला मध्येच टोकत, मैत्रिण नाही गर्लफ्रेन्ड म्हणं, असं सांगतात.) हो, मैत्रिण नाही गर्लफ्रेन्ड. रणबीरच्या त्या गर्लफ्रेन्डने अगदी माझ्यासारखाच टॉप घातल्याचं अचानक माझ्या लक्षात आलं. माझा तो टॉप अनेक दिवसांपासून गायब होता. नंतर मला कळलं की,तिच्या अंगावर माझाच टॉप होता. रणबीर चोरून माझ्या वस्तू आपल्या गर्लफ्रेंडला भेट करत होता.’
रिद्धिमाच्या तोंडून हे ऐकून कपिल हसू लागतो. प्रेक्षकांमध्येही  एकच हशा पिकतो.  यामनीतू आणि रिद्धिमा कपूरचा हा एपिसोड येत्या रविवारी सोनी टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. 

Web Title: the kapil sharma show riddhima kapoor reveals ranbir kapoor gave her clothes to his girlfriends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app