ठळक मुद्देद कपिल शर्मा शो हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या कार्यक्रमाला खूप चांगला टीआरपी मिळत आहे. त्यामुळे सलमानने कपिलला स्पष्टपणे सांगितले आहे की, कोणत्याही प्रकारचा मुर्खपणा तू करू नकोस... 

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. केवळ बॉलिवूड कलाकारच नव्हे तर खेळ जगतातील अनेकांनी या कार्यक्रमात आतापर्यंत हजेरी लावली आहे. द कपिल शर्मा शोचा हा सिझन प्रेक्षकांना चांगलाच आवडत असून या कार्यक्रमाला खूपच चांगला टीआरपी मिळत आहे.

द कपिल शर्मा शोच्या या सिझनचा निर्माता सलमान खान असून त्याने या कार्यक्रमात भारत या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने हजेरी देखील लावली होती. सलमानच्या या कार्यक्रमाला मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत प्रचंड खूश आहे. पण सलमानने कपिलला एक कानमंत्र दिला असल्याची चर्चा आहे. कपिलने कोणत्याही वादात पडू नये असे सलमानने कपिलला सांगितले असल्याचे आईबी टाइम्सने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. आईबी टाइम्सने वृत्त दिले आहे की, द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या कार्यक्रमाला खूप चांगला टीआरपी मिळत आहे. त्यामुळे सलमानने कपिलला स्पष्टपणे सांगितले आहे की, कोणत्याही प्रकारचा मुर्खपणा तू करू नकोस... 

कपिल आणि वाद यांचे खूपच जवळचे नाते राहिले आहे. द कपिल शर्मा शोचा भाग असलेल्या सुनील ग्रोव्हरसोबत कपिलची भांडणं झाल्यामुळे सुनीलने या कार्यक्रमाला रामराम ठोकला होता. त्यानंतर काहीच दिवसांत अली असगरने हा कार्यक्रम सोडला. या सगळ्याचा परिणाम या कार्यक्रमाच्या टीआरपीवर झाला होता आणि अखेरीस हा कार्यक्रम बंद करावा लागला होता. 

त्यानंतर कपिल शर्मा एका वेगळ्या वादात अडकलला होता. त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत काही ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्याने लिहिले होते की, मी गेल्या पाच वर्षांपासून १५ करोड इन्कम टॅक्स भरत आहे. पण तरीही माझ्या ऑफिससाठी मला बीएमसीला ५ लाखाची लाच द्यावी लागली... हेच आहेत का अच्छे दिन?   

कपिलचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. कपिलच्या या ट्वीटवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिप्लाय दिला होता. त्यांनी लिहिले होते की, आम्ही यावर अ‍ॅक्शन घ्यायला सांगितली आहे. गुन्हेगाराला नक्कीच शिक्षा होईल... 

Web Title: Kapil Sharma Show Producer Salman Khan Told Comedian Not to Do Anything 'Silly' Ever Again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.