Birthday Special : एकेकाळी टेलिफोन बुथवर काम करायचा कपिल शर्मा, आज आहे कॉमेडीचा ‘किंग’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 11:08 AM2020-04-02T11:08:31+5:302020-04-02T11:09:41+5:30

 आज कपिल शर्माचा वाढदिवस.

kapil sharma birthday special he worked in telephone booth know how become a comedy king-ram | Birthday Special : एकेकाळी टेलिफोन बुथवर काम करायचा कपिल शर्मा, आज आहे कॉमेडीचा ‘किंग’

Birthday Special : एकेकाळी टेलिफोन बुथवर काम करायचा कपिल शर्मा, आज आहे कॉमेडीचा ‘किंग’

googlenewsNext
ठळक मुद्दे2013 साली कपिलने स्वत:चा ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल शर्मा’ हा शो सुरु केला आणि या शोने कपिलचे आयुष्यच बदलले. 

कॉमेडियन म्हटला की, चित्रपटातील एखाद्या साईड रोलमध्ये त्याला फिट बसवले जाई. पण एका स्टारने विनोदाची परिभाषाच बदलली. कॉमेडियन केवळ साईड रोलपुरता मर्यादित नाही, हे त्याने दाखवून दिले. आम्ही बोलतोय ते कॉमेडीकिंग कपिल शर्मा याच्याबद्दल. कपिल शर्माचा आज वाढदिवस. आज कपिल त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करतोय. कपिलचे आज कोट्यवधी चाहते आहेत. लोक त्याला सोशल मीडियावर फॉलो करतात. बॉलिवूडचे दोन सिनेमे त्याच्या नावावर आहेत. पण इथवर पोहोचण्यासाठी कपिलने अपार कष्ट घेतले आहेत. आज कपिल एका एपिसोडचे कोटी रूपये घेतो. पण आपल्या सुरुवातीच्या दिवसांत कपिलाल बराच संघर्ष करावा लागला होता. अगदी फुकटात काम करावे लागले होते.

कपिल मुळचा अमृतसरचा आहे. कपिलने दहा वर्षे रंगभूमीवर काम केले आहे. खरे तर कपिलला गायक व्हायचे होते. कॉलेजच्या दिवसांत तो गाणी गायचा. सिंगर बनण्याच्या इराद्याने कपिलने संगीत शिकायचे ठरवले. पण संगीताची साधना इतकी सोपी नाही, हे त्याला कळले आणि अचानक त्याने आपला इरादा बदलला. कदाचित नियतीने त्याला तसे करण्यास भाग पाडले. कारण कपिलच्या नशिबात सिंगर बनणे नव्हे तर कॉमेडियन बनणे लिहिले होते.

घरची आर्थिक स्थिती जेमतेम होती. अशात पैशांसाठी काही काळ कपिलने टेलिफोन बुथवरही काम केले. अशात 2006 हे वर्ष कपिलच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. या वर्षात कपिलने ‘हंस दे हंसा दे’ या कॉमेडी शोमध्ये भाग घेतला़ पण संघर्ष सुरुच होता.

2007 साली कपिल ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोच्या तिस-या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला. पण इथे पोहोचणेही सोपे नव्हते. पहिल्यांदा तो या शोसाठी रिजेक्ट झाला होता. पण दुस-यांदा आॅडिशन दिल्यावर त्याची निवड होऊन त्याला एन्ट्री मिळाली होती. हाच कपिल या शोचा विजेता ठरला.

    

यानंतर कपिलने अनेक शो केले़ अनेक अवार्ड शो होस्ट केलेत. पण हार मानली नाही. 2010-2013 या काळात ‘कॉमेडी सर्कस’ या शोमध्ये तो झळकला. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर लोक कपिलला ओळखू लागले. ‘कॉमेडी सर्कस’चे बरेच पर्व जिंकल्यानंतर कपिल ख-या अर्थाने स्टार झाला. 

2013 साली कपिलने स्वत:चा ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल शर्मा’ हा शो सुरु केला आणि या शोने कपिलचे आयुष्यच बदलले. जे लोक आधी हिरो व सुपरस्टारचे फॅन्स होते, ते कॉमेडियन कपिल शर्माचे फॅन्स बनलेत. 

Web Title: kapil sharma birthday special he worked in telephone booth know how become a comedy king-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.