kapil sharma and wife ginni chatrath blessed with a baby girl | Good News: कॉमेडियन कपिल शर्मा झाला बाबा
Good News: कॉमेडियन कपिल शर्मा झाला बाबा

ठळक मुद्देगिन्नी आणि कपिल शर्मा १२ डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते.

छोट्या पडद्यावर कॉमेडियन कपिल शर्मा याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, कपिलच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कपिल बाबा झाला आहे. कपिलची पत्नी गिन्नी चतरथ हिने एका गोंडस कन्येला जन्म दिला आहे. काही तासांपूर्वी खुद्द कपिलने ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली.
मुलगी झालीय. तुमचे असेच आशीर्वाद असू द्या..., असे ही बातमी शेअर करताना कपिलने लिहिले. त्याने ही बातमी शेअर करतानाच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग, सायना नेहवाल, गुरु रंधावा, अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आदींनी त्याला शुभेच्छा दिल्यात.

गिन्नी आणि कपिल शर्मा १२ डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. २००७ साली कॉमेडी रिएलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिलने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने कित्येक शोजमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस, झलक दिखला जा ६ व उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगली पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही आणि त्याने कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. या शोला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.

गतवर्षी त्याने गिन्नीसोबत लग्न केले. त्यापूर्वी दीर्घकाळ दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र कपिलने या रिलेशनशिपबद्दल बरीच गुप्तता पाळली होती. अखेर 2017 मध्ये गिन्नीसोबतचा फोटो शेअर करत त्याने हे नाते जगजाहिर केले होते.

English summary :
Kapil sharma's wife, Ginni Chatrath, has given birth to a cute daughter. A few hours ago Kapil himself shared the good news with the fans through social media. For more latest news visit Lokmat.com.


Web Title: kapil sharma and wife ginni chatrath blessed with a baby girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.