Jitendra Joshi's fan followings increase due to drift lock | ढोलकीच्या तालावरमुळे ​जितेंद्र जोशीच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ
ढोलकीच्या तालावरमुळे ​जितेंद्र जोशीच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ
जितेंद्र जोशी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. त्याने कॅम्पस या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका साकारली होती. या कार्यक्रमानंतर त्याचे फॅन फॉलोव्हिंग दिवसेंदिवस वाढत गेले होते. त्यानंतर त्याने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले. जितेंद्रने नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. कलाकार म्हणून तुम्ही एकाच साच्यातील भूमिका न साकारता वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या पाहिजे असेच नेहमी त्याला वाटते आणि त्यामुळे त्याने नायक, खलनायक, विनोदी अभिनेता अशा सगळ्याच भूमिका साकारल्या आहेत.
दुनियादारी या मालिकेत त्याने साकारलेला खलनायक तर प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला होता. काहीच महिन्यांपूर्वी आलेल्या व्हेंटिलेटर या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती आणि आता जितेंद्र ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तो या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत झळकत आहे.
ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात यंदाच्या पर्वात आपल्याला छोट्या मुली नृत्य सादर करताना पाहायला मिळत आहेत. या लहान मुलींचे नृत्य पाहून केवळ प्रेक्षकच नाहीत तर जितेंद्र जोशीदेखील त्यांच्या प्रेमात पडला आहे. त्याने त्याच्या सेटवर चॉकलेटचे अनेक बॉक्सेस आणून ठेवले आहेत आणि त्याला ज्या चिमुकल्यांचा परफॉर्मन्स आवडतो. त्यांना तो ते चॉकलेट्स देतो. या सगळ्यामुळे या कार्यक्रमातील छोट्याशा स्पर्धक देखील त्याच्या प्रेमात पडल्या आहेत. 
जितेंद्र जोशी हा मोठा सुपरस्टार असला तरी या लहान स्पर्धकांसाठी जितेंद्र हा सुपरस्टार नसून त्यांचा लाडका मामा आहे. या सगळ्या चिमुरड्या त्याला मामा अशीच हाक मारतात आणि तो देखील त्यांचे सगळे लाड पुरवतो. Web Title: Jitendra Joshi's fan followings increase due to drift lock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.