छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सारा अरफीन खान हिला 'जमाई राजा' मालिकेतून लोकप्रिय मिळाली होती. तसेच सारानं इमरान खान आणि कतरिना कैफच्या मेरे ब्रदर की दुल्हन चित्रपटातही काम केलं आहे. लग्नानंतर सारा अरफीन भारत सोडून परदेशात स्थायिक झाली.  सारा अरफीन हिने लंडनमध्ये जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. ही माहिती साराची योगा ट्रेनर जेननं दिली आहे.


योगा ट्रेनर जेननं सांगितलं की, सारा अरफीन खानने आपल्या जुळ्या बाळांची नावं एजा आणि जिदेन ठेवलं आहे.

सारा अरफीन खानची ही पहिली प्रेग्नेंसी असून जवळपास लग्नाच्या दहा वर्षानंतर तिने बाळाला जन्म दिला आहे. खरंतर साराने २००९ साली अरफीन खानसोबत लग्न केले होते. लग्नानंतर ती लंडनला शिफ्ट झाली. तिचा नवरा अरफीन हा मोटिवेशनल स्पीकर आहे.


सारा प्रेग्नेंसीदरम्यान सोशल मीडियावर खूप सक्रीय होती. तिने लंडनमध्ये पार पडलेल्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले होते. बेबी शॉवरला साराच्या कुटुंबातील व्यक्तींनी हजेरी लावली होती. बेबी शॉवरमध्ये साराने सफेद रंगाचा गाऊन परिधान केला होता. त्यात ती खुप सुंदर दिसत होती.


साराने सोशल मीडियावर तिच्या बेबी शॉवरचे फोटोज शेअर करत लिहिलं की, बेबी शॉवर एक आनंदाचा रितीरिवाज आहे. यात मित्र व कुटुंबातील मंडळी होणाऱ्या आईला खूप गिफ्ट्स व आशीर्वाद देतात. हे कोणत्याही बाईच्या जीवनातील सर्वात सुंदर क्षण असतात. मी या दिवसासाठी आभारी आहे. खासकरून माझे मित्रमंडळी व कुटुंबातील सदस्य. त्यांनी माझे क्षण खूप छान बनवले.


सारा अरफीन खानने प्रेग्नेंसीच्या काळात बेबी बंपसोबत फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमध्ये तिनं पिवळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. त्यात बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Jamai Raja Tv actress Sara Afreen Khan become mother and blessed with twins in uk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.