सोना पिच्छा सोडेना...! ‘इंडियन आयडल 12’मधून पुन्हा एकदा अनु मलिक यांची हकालपट्टी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 11:22 AM2021-05-14T11:22:28+5:302021-05-14T11:25:27+5:30

Indion Idol 12: ‘किशोर कुमार स्पेशल एपिसोड’मुळे ‘इंडियन आयडल 12’च्या परिक्षकांना जबरदस्त टीकेला सामोरे जावे लागले. आता काय, तर या शोच्या आणखी एका परिक्षकाची खुर्ची गोत्यात आली आहे.

indion idol 12 anu malik to make an exit from show after sona mohapatra slams music director | सोना पिच्छा सोडेना...! ‘इंडियन आयडल 12’मधून पुन्हा एकदा अनु मलिक यांची हकालपट्टी?

सोना पिच्छा सोडेना...! ‘इंडियन आयडल 12’मधून पुन्हा एकदा अनु मलिक यांची हकालपट्टी?

Next
ठळक मुद्देअनु मलिक यांच्यावर चार महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. या आरोपानंतर अनु मलिक यांची इंडियल आयडलमधून हकालपट्टी करण्यात आली होती़

‘इंडियन आयडल 12’ (Indion Idol 12) हा सिंगींग रिअ‍ॅलिटी शो सतत चर्चेत आहे.  ‘किशोर कुमार स्पेशल एपिसोड’वरून गाजलेला एपिसोड आपण पाहिलाच. या स्पेशल एपिसोडमुळे ‘इंडियन आयडल 12’च्या परिक्षकांना जबरदस्त टीकेला सामोरे जावे लागले. आता काय, तर या शोच्या आणखी एका परिक्षकाची खुर्ची गोत्यात आली आहे. होय, गेल्या काही एपिसोडमध्ये अनु मलिक (anu malik )हा शो जज करताना दिसत आहेत. आता यावरूनही नवा ‘राडा’ सुरु झाला आहे.

अनु मलिक ‘इंडियन आयडल 12’मध्ये दिसताच गायिका सोना मोहपात्रा (Sona Mohapatra) पुन्हा अ‍ॅक्टिव्ह झाली आणि तिने अनु यांच्यावर जबरदस्त टीकास्त्र सोडले. यामुळे अनु मलिक यांचे ‘इंडियन आयडल 12’मधील स्थान पुन्हा धोक्यात आले आहे. त्यांची परिक्षकपदावरून पुन्हा एकदा हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जातेय. शोच्या गेल्या काही एपिसोडमध्ये विशाल ददलानी गैरहजर होता. त्याच्याजागी अनु मलिक यांना शोमध्ये एन्ट्री दिली गेली. पण त्यांची एन्ट्री होताच, सोनाने त्यांच्याविरूद्ध मोर्चा उघडला.

‘एकीकडे देशात कोरोनाचे मृत्यू तांडव सुरु आहे. दुसरीकडे याचा फायदा घेत टीव्ही चॅनल्सनी काही सेक्शुअल प्रिडेटर्सला पुन्हा जजेच्या खुर्चीवर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ही माझ्यासाठीच नाही तर राष्ट्रीय महिला आयोगासाठीही लज्जास्पद बाब आहे,’ असे ट्विट गत 6 मे रोजी सोनाने केले. ती इथेच थांबली नाही तर यानंतरच्या काही पोस्टमध्ये तिने काही कायदेशीर कागदपत्रे पोस्ट केलीत.
आता सोनाच्या या ट्विटनंतर अनु मलिक यांना ‘इंडियन आयडल 12’मधून पुन्हा बाहेर जावे लागणार असे कळतेय. मीडिया रिपोर्टनुसार, येणा-या एपिसोडचे शूटींग अनु मलिक यांनी पूर्ण केली आहे. त्यामुळे येत्या वीकेंडमध्ये ते शोमध्ये दिसतील. पण यानंतर पुन्हा एकदा विशाल ददलानी शोमध्ये परतणार असून अन्नू मलिक यांचा पत्ता कट होणार आहे.

अनु मलिक यांच्यावर चार महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. सर्वप्रथम गायिका श्वेता पंडित हिने अनु मलिक यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यानंतर गायिका सोना मोहपात्रा हिनेही अनु मलिक यांच्यावर गैरवर्तनाचा ठपका ठेवला होता. पाठोपाठ अन्य दोन महिलांनीही अनु मलिकविरोधात आवाज उठवला होता. या आरोपानंतर अनु मलिक यांची इंडियल आयडलमधून हकालपट्टी करण्यात आली होती़

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: indion idol 12 anu malik to make an exit from show after sona mohapatra slams music director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app