Indias best dancer nora fatehi return to the show as judge video | बाबो! पब्लिक डिमांडवर ‘इंडियाज् बेस्ट डान्सर’मध्ये परतणार नोरा फतेही, पुन्हा बसणार जजच्या खुर्चीत?

बाबो! पब्लिक डिमांडवर ‘इंडियाज् बेस्ट डान्सर’मध्ये परतणार नोरा फतेही, पुन्हा बसणार जजच्या खुर्चीत?

डान्स  रिअ‍ॅलिटी शो ‘इंडियाज् बेस्ट डान्सर’ला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. यात पहिल्यांदा जज म्हणून आलेली नोरा फतेहीने सर्वांची मने जिंकली आणि शोलाही जबरदस्त फायदा दिला. जोपर्यंत नोरा शोमध्ये जज म्हणून होती तोपर्यंत टीआरपीच्या बाबतीत ‘इंडियाज् बेस्ट डान्सर’वरच्या क्रमांकावर होता. मात्र मलायका अरोराची जेव्हा शोमध्ये पुन्हा एंट्री झाली तेव्हा नोरा हा शो सोडून गेली. त्यानंतर प्रेक्षकांच्या पसंती काहीशी कमी झालेली दिसली. 


‘इंडियाज् बेस्ट डान्सर'मध्ये नोरा फतेही ?
आजतकच्या रिपोर्टनुसार पब्लिक डिमांडवर नोरा फतेहीला ‘इंडियाज् बेस्ट डान्सर’मध्ये परत बोलवले येऊ शकते. जज म्हणून नोरा परत शोमध्ये येऊ शकते. आता फक्त या चर्चा आहेत, मात्र सोशल मीडियावर व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून असा अंदाज लावला जातोय की नोरा शोमध्ये पुन्हा दिसू शकते. 

पब्लिक डिमांडवर मेकर्सचा निर्णय ?
आजतकच्या रिपोर्टनुसार मेकर्स अशी शिफारस करण्यात आली की नोराला जज म्हणून परत आणले जावे.असे म्हटले जातंय की, त्याच्या अनुपस्थितीत शोची टीआरपी कमी झाली आहे.त्याचवेळी असा दावा देखील केला गेला होता की नृत्याच्या बाबतीतही नोराने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, जज म्हणून सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे नोरा लवकरच शोमध्ये परत येऊ शकते. आपल्या शानदार अदांनी नोरानी चाहत्यांवर मोहिनी घातली होती. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Indias best dancer nora fatehi return to the show as judge video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.