Indian Idol 12 : पवनदीप आणि अरुणिताच्या लग्नाच्या व्हायरल फोटोनंतर आता समोर आले रोमँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 07:13 PM2021-10-11T19:13:38+5:302021-10-11T19:14:59+5:30

पवनदीप आणि अरुणिता यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Indian Idol 12: Romantic photos come to lime light after viral wedding photos of Pawandeep Rajan and Arunita Kanjilal | Indian Idol 12 : पवनदीप आणि अरुणिताच्या लग्नाच्या व्हायरल फोटोनंतर आता समोर आले रोमँटिक फोटो

Indian Idol 12 : पवनदीप आणि अरुणिताच्या लग्नाच्या व्हायरल फोटोनंतर आता समोर आले रोमँटिक फोटो

Next

छोट्या पडद्यावरील सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉलचा १२वा (Indian Idol 12) सीझन नुकताच संपला. हा सीझन खूप चर्चेत आला होता. या सीझनमधील काही स्पर्धकदेखील खूप चर्चेत आले होते आणि त्यातील काहींनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. त्यातील दोन स्पर्धक म्हणजे शोचा विजेता पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल. या दोघांनी आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. या शोमध्ये या दोघांच्या केमिस्ट्रीची खूप चर्चा रंगली होती. शो संपल्यानंतर ते दोघे चर्चेत येत असतात. नुकताच पवनदीप आणि अरुणिताचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत ते दोघे नव्या जोडप्यांप्रमाणे दिसत आहेत. त्यानंतर आता पवनदीप आणि अरुणिता यांचे रोमँटिक फोटो समोर आले आहेत. 

व्हायरल झालेल्या या फोटोत अरुणिता कांजीलाल लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये तर पवनदीप शेरवानीमध्ये दिसतो आहे. त्यामुळे त्या दोघांनी लग्न केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या फोटोबाबत त्या दोघांकडून अद्याप कोणताच खुलासा झालेला नाही. दरम्यान आता त्यांचे रोमँटिक फोटो समोर आले आहेत. या फोटोतील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. खरेतर हा फोटो त्यांच्या म्युझिक अल्बममधील आहे. यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल हे दोघे ओ सैयोनी या गाण्यासाठी एकत्र आले आहेत. या अल्बमला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

Web Title: Indian Idol 12: Romantic photos come to lime light after viral wedding photos of Pawandeep Rajan and Arunita Kanjilal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app