indian idol 12 pawandeep rajan roommate ashish kulkarni is corona positive | ‘इंडियन आयडल 12’वर कोरोनाचे संकट, पवनदीपनंतर आता आशीष कुलकर्णीला झाली लागण!!

‘इंडियन आयडल 12’वर कोरोनाचे संकट, पवनदीपनंतर आता आशीष कुलकर्णीला झाली लागण!!

ठळक मुद्देयेत्या शनिवारी इंडियन आयडलचा ‘रामनवमी स्पेशल एपिसोड’ पाहायला मिळणार आहे. यात योगगुरू रामदेव बाबा प्रमुख पाहुणे म्हणून दिसणार आहेत.

राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना आता मनोरंजन विश्वातील अनेक लोकप्रिय शोच्या सेटवरही कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळतोय. ‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12) चा आणखी एका स्पर्धकाला कोरोनाची लागण झाली आहे. या स्पर्धकाचे नाव आहे आशीष कुलकर्णी (Ashish Kulkarni).  कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आशीषला तात्काळ क्वारंटाइन करण्यात आले आहे.
‘टीव्ही 9’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. अर्थात आशिषला कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला चॅनलने अद्याप तरी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. (Indian Idol 12 Ashish Kulkarni is corona positive)

काही दिवसांपूर्वीच शोचा लोकप्रिय स्पर्धक पवनदीप राजन (Pawandeep Rajan) याला कोरोनाची लागण झाली होती. आशीष हा पवनदीपचा रूममेट होता. प्रोटोकॉलनुसार या आठवड्यात सर्व स्पर्धकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यादरम्यान आशिषचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. पवनदीपप्रमाणेच आता आशीषही क्वारंटाईन रूममधून शोमध्ये सहभागी होईल, असे कळतेय.
 पवनदीप आणि आशीषला कोरोनाची लागण झाल्यामुळे इंडियन आयडलच्या सेटवर खळबळ माजली आहे. एकापाठोपाठ एक स्पर्धक कोरोनाच्या विळख्यात सापडत असतील तर शोचे काय होणार? असा प्रश्न चाहत्यांनाही पडला आहे.

येत्या शनिवारी इंडियन आयडलचा ‘रामनवमी स्पेशल एपिसोड’ पाहायला मिळणार आहे. यात योगगुरू रामदेव बाबा प्रमुख पाहुणे म्हणून दिसणार आहेत.
या कार्यक्रमात ते कोरोना निगेटिव्ह झाल्यावर पुढे काय करावे, यासंबंधी पवनदीप आणि आशिष दोघांनाही खास टिप्स देताना दिसणार आहे.   काही दिवसांपूर्वी ‘इंडियन आयडॉल 12’चा होस्ट आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आदित्यने सोशल मीडियावर आपण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: indian idol 12 pawandeep rajan roommate ashish kulkarni is corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.