If there is no actress, I would have definitely become a stylist- Sonya | अभिनेत्री नसते, तर मी नक्कीच स्टायलिस्ट झाले असते- सोन्या

अभिनेत्री नसते, तर मी नक्कीच स्टायलिस्ट झाले असते- सोन्या


स्टार प्लसवरील 'नजर' या मालिकेतील तरूण डायन रूबीवर नजर टाकल्यास तिचे ग्लॅमरस आणि मादक रूप नक्कीच तुमच्या नजरेत भरल्याशिवाय राहणार नाही. वेशभूषेबरोबरच अंगावरील विविध आभूषणे यांची निवड कधी कधी सोन्या स्वत:च करीत असते.


'नजर'मधील सर्व कलाकारांमध्ये  सोन्या या अभिनेत्रीची वेशभूषा ही सर्वांत फॅशनेबल आहे. ती बरेचदा काही अफलातून शैलीदार कपड्यांत वावरताना दिसते. याबाबत सोन्या म्हणाली की, “मी साकार करीत असलेल्या रूबीच्या व्यक्तिरेखेला स्टाईल आणि फॅशन यांची उत्तम जाण असून ती अनेकदा अतिशय फॅशनेबल कपडे आणि आभूषणे परिधान करीत असते. रूबीची व्यक्तिरेखा साकारण्यातील माझी सर्वात आवडती गोष्ट म्हणजे ती कशाही प्रकारे फॅशनेबल कपडे वापरू शकते आणि ते सर्व तिला अचूक शोभून दिसतात. मला स्वत:ला फॅशनची आवड आणि जाण असल्याने काही प्रसंगांत मी स्वत:च माझी वेशभूषा करण्याचा आग्रह धरला आणि निर्मात्यांनीही तो मानला. लहान वयापासूनच मला विविध प्रकारचे कपडे घालण्याची आवड होती आणि मला वेशभूषा करायला फार आवडत असे. अभिनेत्री झाले नसते, तर मी नक्कीच एक स्टायलिस्ट बनले असते. नजरची कथा जितकी मनाची पकड घेणारी आहे, तितकीच त्यातील व्यक्तिरेखांची वेशभूषाही नजरेत भरणारी आहे. त्यामुळे या मालिकेत मला अभिनयाबरोबरच माझ्या वेशभूषेची आणि फॅशनची हौसही भागविता येत असल्याने मी खुशीत आहे. रूबीला अशा विविध फॅशनेबल आणि शैलीदार कपड्यांमध्ये पाहायला प्रेक्षकांनाही आवडेल, असे मला वाटते.”
फॅशनेबल कपड्यांतील सोन्याच्या व्यक्तिरेखेची प्रेक्षकांनी दखलच घेतली आहे असे नव्हे, तर आपण अभिनेत्रीबरोबरच अन्यही कोणीतरी आहोत, हे सिद्ध करण्याची संधीही तिला दिली आहे.

Web Title: If there is no actress, I would have definitely become a stylist- Sonya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.