I have to wear jewellery weighing 10 kgs to get into Dilruba’s look - Sreejita De | दिलरुबाप्रमाणे दिसण्यासाठी श्रीजिताने केली 'ही' गोष्ट

दिलरुबाप्रमाणे दिसण्यासाठी श्रीजिताने केली 'ही' गोष्ट

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेत अलीकडेच दिलरुबा नावाच्या एका अपारंपरिक चेटकीणचा प्रवेश झाला असून ही भूमिका श्रीजिता डे ही अभिनेत्री साकारत आहे. दिलरुबाच्या मोहक रूपाने प्रेक्षकांची मने जिंकली असली, तरी तिच्या भयावह हास्याने त्यांच्या हृदयाचा थरकापही उडतो. मात्र तिच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट म्हणजे तिच्या अंगावरील विविध दागदागिने!

डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत विविध ऑक्सिडाइज्ड चांदीच्या दागिन्यांनी मढलेली आणि हाताता भरपूर बांगड्या चढविलेली दिलरुबा ही पडद्यावर आली की नक्कीच एक उत्साहाची लाट निर्माण होते. आपल्या या रुपावर खुश असलेली श्रीजिता सांगते, “दिलरुबा ही एक आधुनिक आणि शैलीदार चुडैल असून तिचं रूप जरा हटके आहे. मला जेव्हा या भूमिकेची माहिती देण्यात आली, तेव्हा तिच्या स्वभाव वैशिष्ट्यांखेरीज तिच्या गळ्यातील ऑक्सिडाइज्ड चांदीचे हार आणि माळा तसंच जवळपास संपूर्ण हात आच्छादून टाकणार्‍्या तिच्या बांगड्या यांनी माझं सर्वप्रथम लक्ष वेधून घेतलं. मी आजवर कधीच चेटकीणची भूमिका रंगविलेली नाही. तसंच या भूमिकेत मला प्रथमच इतके अवजड दागिने अंगावर वागवावे लागत आहेत. दिलरुबाचं रूप साकारण्यासाठी मला अंगावर तब्बल 10 किलो वजनाचे दागिने घालावे लागतात. मालिकेच्या चित्रीकरणाचं वेळापत्रक फार उशिरापर्यंत आहे. त्यातच मनला कधी कधी स्टंटही करावे लागतात आणि हे सारं हे जड दागिने अंगावर घालून करावं लागतं. असं असलं, तरी मला ही भूमिका साकारताना खूपच मजा येत आहे. तिचं रूप मला फारच आवडतं. आता प्रेक्षकांनाही माझा हा अभिनय पसंत पडू दे, हीच अपेक्षा.” तिचे हे देखणे दागिने आणि आकर्षक रूप यामुळे श्रीजिता तिची भूमिका विनासायास पार पाडताना दिसते. आपल्या याच लक्षवेधक आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर प्रेक्षकांना रोज रात्री टीव्हीच्या पडद्याला खिळवून ठेवण्यात श्रीजिता भाग पाडेल, यात काही शंका नाही.

Web Title: I have to wear jewellery weighing 10 kgs to get into Dilruba’s look - Sreejita De

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.