I can never do dance like Madhuri Dixit, confessed by Raveena Tandon | डान्स या अभिनेत्रीसारखा मी कधीच करू शकत नाही, रवीना टंडनने दिली कबुली
डान्स या अभिनेत्रीसारखा मी कधीच करू शकत नाही, रवीना टंडनने दिली कबुली

कलाकार फार क्वचितच इतर कलाकारांची प्रशंसा करताना दिसतात किंवा स्वतःची तुलना दुसऱ्या कलाकारांसोबत करताना पहायला मिळतात. मात्र स्टार प्लस वाहिनीवरील डान्स रिएलिशी शो नच बलियेच्या नवव्या सीझनमधील आगामी भागात परिक्षक रवीना टंडनने बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीच्या नृत्याची प्रशंसा केली. आता ही अभिनेत्री कोण असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तिने माधुरी दीक्षितच्या डान्सबद्दल कौतूक केलं. रवीनाने माधुरी दीक्षितसारखे नृत्य कधीच करू शकत नसल्याची कबुली दिली आहे. 

नित्यामी शिर्के आणि शंतनू माहेश्वरी ही या कार्यक्रमातील एक स्पर्धक जोडी असून यावेळी नित्यामीला तिचे एकटीचे नृत्यकौशल्य दाखविण्याची संधी मिळाली होती. यावेळी नित्यामीने कथ्थक या शास्त्रीय नृत्यप्रकारावर आधारित एक नृत्य सादर केले जे माधुरीने अनेक चित्रपटांमधून साकारले होते.

माधुरी ही आजही असंख्य तरुणींसाठी एक प्रेरणास्थान आहे. नित्यामीचे अप्रतिम नृत्य पाहिल्यावर रवीनाने तिचे अभिनंदन करताना सांगितलं की, कथ्थक हा नृत्यप्रकार तसा अवघडच आहे. या नृत्याबद्दल रेखाजींनी एक मापदंड निर्माण केला होता आणि त्यानंतर जर दुसऱ्या कोणी तो साध्य केला असेल, तर ती अभिनेत्री आहे माधुरी दीक्षित. मी तर या जन्मात माधुरीजींसारखं नृत्य करू शकणार नाही.


नच बलिये-९’मधील हा संस्मरणीय क्षण शनिवार-रविवारी रात्री ८ वाजता फक्त ‘स्टार प्लस’वर पहायला मिळणार आहे.


Web Title: I can never do dance like Madhuri Dixit, confessed by Raveena Tandon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.