रिलेशनशीप थीमवर रंगणार 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 16:07 IST2019-02-01T16:06:29+5:302019-02-01T16:07:36+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि त्यातील कलाकार हे कोणताही प्रसंग विनोदी बनवण्यासाठी अगदी मशहूर आहेत. येत्या आठवड्यात नात्यांवरही काही विनोदी किस्से दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात येणार आहे.

रिलेशनशीप थीमवर रंगणार 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'
रिलेशनशीप हा असा शब्द आहे जो हल्ली सहजपणे उच्चारला जातो. नात्याचे महत्त्व प्रत्येकालाच ठाऊक असते. तसेच नात्यासोबत येणारी जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्नही आपल्याकडून आपसूक केला जातो. प्रेम, विश्वास, समंजसपणा यांच्यासह काही गमतीजमती देखील नात्याचा एक हिस्सा असतात. आणि जिथे गमती-जमती, विनोदी किस्से आहेत तिथे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि त्यातील कलाकार हे कोणताही प्रसंग विनोदी बनवण्यासाठी अगदी मशहूर आहेत. येत्या आठवड्यात नात्यांवरही काही विनोदी किस्से दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची पुढील थीम ‘रिलेशनशिप’ वर आधारित असून 'जावई-सासू', 'वडील-मुलगी-प्रिंसिपल', 'पॅड्या-पशा' यांच्यामध्ये असलेले नाते आणि त्यांच्या नात्यातील गमतीशीर किस्से सोमवारी आणि मंगळवारी रंगणार आहेत.
या थीममध्ये लांबचा चुलता गेला म्हणून पॅड्याच्या भेटीला आलेला पशा, खरे तर नातेवाईक काय बोलतील म्हणून पॅड्याच्या दु:खात सामील व्हायला आलेला पशा आणि त्यानंतर थेट बोंबीलवरुन होणारी चर्चा, जावई आणि सासू यांच्यामध्ये ‘ऍडल्ट सिनेमा’वरुन होणारा विनोदी वाद, मुलगी-वडील-मुख्याध्यापक यांचे संभाषण असे विनोदी स्किट्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. कलाकार पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर, पृथ्वीक, शीतल, समीर चौघुले यांनी भन्नाट परफॉर्मन्स देऊन जज महेश कोठारे यांनाही भरपूर हसवले आहे. तुम्हाला पण या हास्यजत्रेत सामील व्हायचे असेल तर 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठीवर पाहत रहा.