'संजू'ची अभिनेत्री करिश्मा तन्ना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जरा जास्तच अ‍ॅक्टिव्ह झालेली दिसतेय. इन्स्टाग्रामवर स्वत:चे एकापाठोपाठ एक असे अनेक हॉट फोटो शेअर करण्याचा सपाटा तिने लावला आहे. सध्या ती मालदीवमध्ये असून तिने समुद्र किनाऱ्यावर बिकनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

तमन्नाने हे बिकिनीतील फोटो शेअर केलेत आणि काही तासातच ते व्हायरल झालेत. सध्या तमन्ना मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. याच ठिकाणचे हे फोटो आहेत.

'नागीन'आणि 'कयामत की रात' या टीव्ही शोमुळे करिश्मा तन्ना हे नाव लोकप्रिय झाले. यानंतर रणबीर कपूरच्या 'संजू'मध्ये तिला संधी मिळाली.

या चित्रपटात करिश्माने विकी कौशलच्या गर्लफेन्डची भूमिका साकारली आहे. 'संजू' रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचे 'मुझे चांद पे ले चलो' हे गाणे रिलीज झाले होते.

यात रणबीर कपूर आणि करिश्मा तन्ना हे दोघे दिसले होते. या चित्रपटात करिश्माची भूमिका अगदीचं छोटी होती. पण त्यातही तिने आपली छाप सोडली होती. रणबीरनंतर करिश्मा रणवीरसोबत 'चिंग्स चायनीज'च्या नव्या जाहिरातीत झळकली.

करिश्मा तन्नाने आजवर 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'कही तो मिलेंगे','देस में निकला होगा चाँद', 'शरारत', 'कुसूम' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

तिच्या आजवरच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. 'कयामत की रात'मधली तिची राणीची भूमिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडली होती. 

Web Title: Hotness Overloaded! TV actress Karishma Tanna did a hot photoshoot in a bikini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.