Hina Khan's father dies, actress leaves Kashmir for Mumbai | हिना खानच्या वडिलांचे निधन, अभिनेत्री काश्मीरहून मुंबईकडे झाली रवाना

हिना खानच्या वडिलांचे निधन, अभिनेत्री काश्मीरहून मुंबईकडे झाली रवाना

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे आज हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. वडिलांच्या निधनामुळे हिनावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हिना काश्मीरला शूटिंगसाठी गेली होती. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच ती मुंबईकडे रवाना झाली आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे हिना खानच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. त्यात लिहिले की, ‘अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन झाले आहे. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे’.

हिना खान वडिलांच्या खूप क्लोज होती. ती नेहमी इंस्टाग्रामवर वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करायची. 'ये रिश्ता क्या केहलाता है' मालिकेतून हिना घराघरांत पोहोचली . तिने सिनेइंडस्ट्रीत येण्याचा निर्णय तिच्या वडिलांना सुरुवातीला आवडला नव्हता. मात्र तिचे यश पाहून त्यांनी तिला प्रोत्साहन दिले, असे हिना नेहमी सांगते. हिना आणि तिच्या वडिलांमध्ये फार जिव्हाळ्याचे नाते होते. दोघे एकमेकांसोबत मित्रांसारखेच राहायचे.


काही दिवसांपूर्वी हिना खान आई-वडिलांसोबत मालदिवला सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली होती. तिने तेथील वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hina Khan's father dies, actress leaves Kashmir for Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.