हिना खान हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध नाव आहे. हिना खानने नुकताच आपला 32वा वाढदिवस सेलिब्रेट केला . हिनाचा जन्म श्रीनगरमध्ये झाला. 2009मध्ये हिनाने गुडगावमधून एमबीए केले. हिनाला पत्रकार व्हायचे होते मात्र तिच्या नशिबात अभिनेत्री होणे लिहिले होते. हिनाने एअरहॉस्टेससाठी अर्ज भरला होता मात्र तिला मलेरिया झाल्याने ती जाऊ शकली नाही.

यानंतर तिला रिश्ता क्या कहलाता है मालिकेची ऑफर आली. आपल्या करिअरची सुरुवात हिनाने ये रिश्ता क्या कहलाता मालिकेतून केली. हिना खान ‘अक्षरा बहु’ म्हणून घराघरात पोहोचली. यानंतर हिना रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडीमध्ये दिसली. हिना या स्पर्धेत टॉप 4मध्ये होती. यानंतर हिना बिग बॉस 11 मध्ये झळकली आणि तर दिवशी ट्रोल होऊ लागली. या शोसाठी तिने 8 लाख रुपये घेतले.

हिना एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की 2' मालिकेत कमोलिकाची भूमिका साकारताना दिसली होती. मात्र त्यानंतर तिने हा शो सोडला. रिपोर्टनुसार तिने तीन चित्रपट साईन केल्यामुळे डेलिसोपसाठी हिनाजवळ वेळ नाही, म्हणून तिने ही मालिका सोडल्याचे कळतेय.

पण एक दुसरीही चर्चा रंगतेय. त्यानुसार, कमोलिकाच्या रोलवर हिना समाधानी नव्हती. हिनाने साईन केलेल्या प्रोजेक्टमध्ये एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. तूर्तास याचा खुलासा झालेला नाही.

पण तिच्या डेब्यू सिनेमाचे शूटींग मात्र अखेरच्या टप्प्यात असल्याचे कळतेय. हा चित्रपट एक महिलाप्रधान चित्रपट आहे. यात हिना एका स्वतंत्र बाण्याच्या मुलीची भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटाची कथा ९० च्या दशकातील काश्मिरवर आधारित आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hina khan know some interesting facts related to her personal and private life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.