12 व्या गोल्ड अवॉर्ड्स सोहळा पार पडला यावेळी या अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने अवघी हिंदी टीव्ही इंडस्ट्री येथे अवतरली होती. यावेळी मालिकेतील अभिनेत्री ग्लॅमरस अंदाजात रेड कार्पेटवर अवतरल्या होत्या. पण सगळ्यात लक्षवेधी ठरली ती अभिनेत्री हिना खान. लाइट पिंक कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये हिना अतिशय सुंदर दिसली. या सोहळ्यात एक दोन नव्हे तर तीन पुरस्कारांवर हिनाने मोहोर उमटवली. हिनाला टीव्ही पर्सनॅलिटी ऑफ द इयर, सर्वात फिट अॅक्ट्रेस आणि बेस्ट निगेटिव्ह रोलसाठी सन्मानित करण्यात आले. हिनाने या सोहळ्यातील तिच्या लूकचे खास फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. याच निमित्ताने तिच्या सौंदर्यावरही चर्चा रंगत आहे. 

अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली  हिना तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. त्यामुळेच की काय आपल्या फिटनेसमुळे  अनेक अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देत आहे. फिट राहावं आणि सौंदर्य टिकून राहावं यासाठी ती बरीच मेहनत घेते.काही दिवसांपूर्वीच हिनाने स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. 

हे फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हिना ब्लॅक नाइटीमध्ये ग्लॅमरस पोज देताना दिसतेय.कसौटी जिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेच्या दुस-या सीझनमध्ये हिना कोमोलिकाची भूमिका साकारताना दिसली होती. हिना कोमोलिका बनून पडद्यावर आली आणि पहिल्याच एपिसोडमध्ये तिने स्वत:ची छाप सोडली. जुन्या कोमोलिकाला विसरून प्रेक्षक नव्या कोमोलिकाच्या प्रेमात पडले.

पण काहीच महिन्यानंतर हिना ‘कसौटी जिंदगी के 2’ सोडणार अशी बातमी आली आणि प्रेक्षकांची निराशा झाली. ही बातमी खरी ठरली आणि हिना ‘कसौटी जिंदगी के 2’मधून गायब झाली.  कशासाठी तर चित्रपटासाठी. होय,   हिना बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच विक्रम भटच्या सिनेमात झळकणार आहे.  यात ती एक फॅशन डिझायनरची भूमिका साकारणार आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hina Khan is the fittest actress in the TV industry, Know the secret behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.