Hina khan doing debut from vikram bhatt movie | मुहूर्त ठरला ! एकता कपूरची ही अभिनेत्री करणार विक्रम भटच्या सिनेमातून डेब्यू

मुहूर्त ठरला ! एकता कपूरची ही अभिनेत्री करणार विक्रम भटच्या सिनेमातून डेब्यू

टिव्ही अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेत हिनाने केवळ काही दिवसांसाठी कमोलिकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर हिनाकडे वेळ नसल्यामुळे तिने ही मालिका सोडली. राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार हिना बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. हिना लवकरच विक्रम भटच्या सिनेमात झळकणार आहे. हिना खान यात मुख्य भूमिका साकारणार आहे.  सिनेमाच्या पहिल्या शूटिंगचे शेड्यूल पूर्ण केले आहे. यात ती एक फॅशन डिझायनरची भूमिका साकारणार आहे.  

 
हिना खानला आजही तिचे चाहते हिना म्हणून कमी आणि ‘अक्षरा बहू’ म्हणून अधिक ओळखतात. आपली ही ओळख पुसण्यासाठी हिनाने जीवाचा बराच आटापीटा केला. साचेबद्ध कामात अडकून न राहता काही तरी हटके करायच्या निर्णयामुळेच तिने ‘ये रिश्ता....’मालिका सोडत आव्हानात्मक कामे स्विकारली. ‘बिग बॉस 11’ आणि ‘खतरों के खिलाडी सिझन 8’मध्येही ती सहभागी झाली.


काही दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या इंडिया डे परेडमध्ये सहभागी झाली होती. हिना पहिली टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आहे जिला न्यूयॉर्कमधील इंडिया डे परेडमध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे होता. हिनाने न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या इंडिया डे परेडमधील फोटो सोशल मी़डियावर शेअर केले आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hina khan doing debut from vikram bhatt movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.