Himesh Reshammiya signs Rohit Raut for the next film 'Main Jahan Rahun' on the sets of Indian Idol Season 11 | इंडियन आयडलमधील या स्पर्धकाला लागली लॉटरी, हिमेशने केले चित्रपटासाठी साईन

इंडियन आयडलमधील या स्पर्धकाला लागली लॉटरी, हिमेशने केले चित्रपटासाठी साईन

ठळक मुद्देरोहित राऊतची प्रशंसा करताना हिमेश रेशमिया म्हणाला, “तुझ्या आजच्या सादरीकरणाने मंच दणाणून सोडलास आणि प्रत्येकवेळी तू भोवतालच्या सर्वांना प्रेरित करतोस. ‘मैं जहाँ रहूँ’ या माझ्या आगामी चित्रपटामध्ये पार्श्वगायक म्हणून तुला ब्रेक देण्याची माझी इच्छा आहे.”

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

71 वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘इंडियन आयडल ११’ मध्ये निर्मात्यांनी पोलिस दल, सैन्यदल अग्निशमन दलातील शूर सैनिकांना आदरांजली वाहण्याचे ठरवले आहे. त्यांच्यासाठी खास गाणी स्पर्धक सादर करणार आहेत. 

इंडियन आयडल ११ मधील मराठी मुलगा रोहित राऊत या कार्यक्रमाच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जातो. त्याच्या ऑडिशनपासून आजपर्यंतच्या परफॉर्मन्सचे प्रत्येकाकडून कौतुक होत आहे. त्याच्या परफॉर्मन्समध्ये एक एनर्जी नेहमीच पाहायला मिळते. त्याने ‘माँ तुझे सलाम’ आणि ‘जय हो’ या गाण्यांवर हृदयस्पर्शी सादरीकरण केले. रोहितच्या या समाधानकारक सादरीकरणाने हिमेश इतका प्रभावित झाला की, त्याने ‘मैं जहाँ रहूँ’ या त्याच्या आगामी चित्रपटासाठी रोहित राऊतला साईन केले.
 
रोहित राऊतची प्रशंसा करताना हिमेश रेशमिया म्हणाला, “तुझ्या आजच्या सादरीकरणाने मंच दणाणून सोडलास आणि प्रत्येकवेळी तू भोवतालच्या सर्वांना प्रेरित करतोस. ‘मैं जहाँ रहूँ’ या माझ्या आगामी चित्रपटामध्ये पार्श्वगायक म्हणून तुला ब्रेक देण्याची माझी इच्छा आहे.”
 
तो पुढे म्हणाला, “जावेद अख्तर यांनी हे गाणे लिहिले आहे, ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा आम्ही एकत्र काम करत आहोत. या चित्रपटातील गाणी खूपच छान असणार आहेत. या कामामध्ये तू आमच्यासोबत असशील याचा मला खूप आनंद होत आहे.” 

Web Title: Himesh Reshammiya signs Rohit Raut for the next film 'Main Jahan Rahun' on the sets of Indian Idol Season 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.