ठळक मुद्देआता या कार्यक्रमात अनूची जागा हिमेश रेशमियाने घेतली असून या आठवड्यापासून प्रेक्षकांना त्याला या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. अनू मलिक, नेहा कक्कड आणि विशाल दादलानी या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. 

या कार्यक्रमात अनू मलिक, नेहा कक्कड आणि विशाल दादलानी परीक्षकाची भूमिका बजावत होते. पण आता या कार्यक्रमात अनूची जागा हिमेश रेशमियाने घेतली असून या आठवड्यापासून प्रेक्षकांना त्याला या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. या वर्षीच्या ‘इंडियन आयडल’चे थीम ‘एक देश एक आवाज’ असून या आठवड्यात 90 च्या दशकातील गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. ‘इंडियन आयडल सीझन 11’ मधील अव्वल 10 स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध गायक कुमार सानू आणि गायिका अनुराधा पौडवाल उपस्थित राहाणार आहेत.

या भागात ‘सानु एक पल चैन’ या गाण्यावरील सनी हिंदुस्तानीच्या सादरीकरणाने एक अविस्मरणीय वातावरण निर्माण होणार आहे. कुमार सानू गाणे ऐकल्यावर सनीला आशीर्वादाच्या रूपाने पैसे देणार आहे तर सनीच्या या गाण्याच्या उत्कृष्ट सादरीकरणानंतर हिमेश रेशमिया मंचावर येऊन राजकुमार संतोषी यांच्या आगामी चित्रपटातील त्याच्या नवीन गाण्यासाठी सनीला साईन करणार आहे.
 
याविषयी हिमेश सांगतो, “मी हा शो नियमितपणे पाहात होतो आणि सनीला मी गाताना ऐकले आहे. पण त्याला प्रत्यक्षात ऐकल्यानंतर मी त्याच्या गायकीच्या प्रेमात पडलो. त्याच्या गाण्यातील प्रामाणिकपणा त्याच्या नजरेत स्पष्टपणे दिसतो आणि त्याने तो हरवू नये असे मला वाटते. तो प्रामाणिकपणाच त्याला यशस्वी बनवेल असे मला वाटते.”


 
 कुमार सानू सांगतो, “मला तुझे सादरीकरण खूपच आवडले, विशेषतः तू ज्या प्रकारे वरच्या जागा घेतोस त्यामधून तुझे गाण्याप्रती असलेले समर्पण दिसते. तू अशीच वाटचाल करत राहिलास तर एक महान गायक होण्यापासून तुला कोणी रोखू शकणार नाही.”
 

Web Title: Himesh Reshammiya replaces #metoo accused Anu Malik on 'Indian Idol'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.