This heart melting video of Jay Banushali’s daughter Tara crying for her mother Mahhi Vij | आईच्या कुशीत जाण्यासाठी चिमुकलीचा हट्ट, माही वीज मुलीला सोडून दिल्लीला झाली रवाना

आईच्या कुशीत जाण्यासाठी चिमुकलीचा हट्ट, माही वीज मुलीला सोडून दिल्लीला झाली रवाना

टीव्ही अभिनत्री माही विज आणि जय भानुशाली नेहमीच त्यांची  मुलगी तारासोबत मजा मस्ती करनाता दिसतात. दोघेही लेकीचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात.नहमीच ताराच्या बाललीला प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतात.

जय -माही तारासोबतची प्रत्येक गोष्ट व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातू चाहत्यांसह शेअर करत असतात. त्यामुळे ताराच्याही इतर स्टार किडसप्रमाणे व्हिडीओला अधिक पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळते.  माही वीजचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. कारमधून उतरुन माही एअरपोर्टकडे जायला निघाली. 


त्यावेळी आपल्या आईचं असं तिला एकटीला सोडून जाणं  ताराला खटकलं. मग ताराने आपल्या आईकडे जाण्यासाठी हट्ट करु लागली. आईनं आपल्याला कुशीत घ्यावे यासाठी ती जोरजोराने रडू लागली. तिचा बालहट्ट असा काही होता की तिचा सांभाळ करणा-या केअरटेकरलाही ताराला सांभाळणं कठीण झालं होतं. ताराच्या याच बाललीलांचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. आपल्या आईच्या कुशीत जाण्यासाठी तारा कसा हट्ट करतेय ते या व्हिडीओत पाहायला मिळतंय. 

 

माही एका जाहीरातीच्या शूटसाठी दिल्लीला जाणार होती. तेव्हा एअरपोर्टवर मुलगी ताराला बाय -बाय करतानाचा हा व्हिडीओ आहे. ताराला बघून माही देखील भावूक झाली होती, मुलीला पहिल्यांदा तिला असे सोडू जाण्याची तिचीही इच्छा नव्हती. पण दिलेल्या कमिटमेंट्स पूर्ण करण्यासाठी तिला जावे लागले.

 

स्वतःची मुलगी झाली म्हणून दत्तक घेतलेल्या मुलांना सोडले, जय माहीवर संतापले चाहते


जय आणि माही दोघांनाही स्वतःचे मुल नव्हते. तोपर्यंत या कपलने मुलांचा चांगला सांभाळ केला. मात्र २०१९ मध्ये या कपलच्या आयुष्यात स्वतःच्या बाळाचे आगमन झाले आणि कुठेतरी दत्तक घेतलेल्या मुलांवरुन त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.जय माही कुठेही फिरायला जातात तेव्हा फक्त मुलगी तारालाच घेवून जायचे आणि दोन्ही मुलांना घरी सोडून जायचे. एरव्ही राजवीर आणि खुशी बरोबर वेळ घालवणारे कपलने ताराच्या जन्मानंतर दोघांबरोबर वेळ घालवणेही बंद केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: This heart melting video of Jay Banushali’s daughter Tara crying for her mother Mahhi Vij

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.