ठळक मुद्देविकास खोकरने सांगितले की, अंधेरी पश्चिम येथे चाय-कॉफी म्हणून एक कॉफी शॉप आहे. तिथे एकता कपूर अनेकवेळा येते असे मला सांगण्यात आले होते. त्यांची नजर माझ्यावर पडली तर मला चांगले काम मिळेल असा विचार करून मी तिथे गेलो होतो. तिथे माझी भेट विकास गुप्तासोबत झाली.

विकास गुप्ता बिग बॉस मध्ये झळकला होता. विकास हे छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध नाव आहे. पण तो त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. कधी तो त्याच्या भूतकाळामुळे तर कधी त्या्च्या कुटुंबीयांमुळे चर्चेत असतो. पण आता एका वेगळ्याच कारणामुळे तो चर्चेत आला आहे. रोडीज या कार्यक्रमाच्या एका विजेत्याने त्याच्यावर अतिशय गंभीर आरोप लावला आहे.

रोडीज या कार्यक्रमाचा विजेता असलेल्या विकास खोकरने विकास गुप्तावर आरोप लावला आहे. विकास गुप्तावर कोणते आरोप लावण्यात आले आहेत हे वाचून तुम्हाला धक्काच बसेल. २०१२ मध्ये रोडीज या कार्यक्रमाचे विजेतेपद विकास खोकरला मिळाले होते. त्यामुळे त्याला अनेक ऑफर मिळायला लागल्या होत्या. पण त्याचवेळी त्याला मिळालेल्या एका ऑफरमुळे त्याला चांगलाच धक्काच बसला होता. कारण काही लोकांनी लैंगिक संबंध ठेवल्यास तुला स्टार करेन असे सांगितले होते. अशा लोकांमध्ये विकास गुप्ताचा देखील समावेश होता. 

विकास खोकरने सांगितले की, अंधेरी पश्चिम येथे चाय-कॉफी म्हणून एक कॉफी शॉप आहे. तिथे एकता कपूर अनेकवेळा येते असे मला सांगण्यात आले होते. त्यांची नजर माझ्यावर पडली तर मला चांगले काम मिळेल असा विचार करून मी तिथे गेलो होतो. तिथे माझी भेट विकास गुप्तासोबत झाली. मी रोडीजचा विनर असून सध्या कामाच्या शोधात असल्याचे मी त्यांना सांगितले तर त्यांनी मला त्यांचा नंबर दिला आणि मी त्यांना माझा नंबर दिला. त्यानंतर काही दिवसांनी विकास यांनी मला फोन करून घरी बोलावले. त्यावर आपण कॉफी शॉपमध्ये भेटूया असे मी उत्तर दिले. त्यावर माझे शरीर दुखत आहे... तू मला मसाज पण देशील असे त्यांनी फोनवर सांगितले. ही गोष्ट ऐकून मी चकीत झालो होतो. काय करायचे मला काहीच सुचत नव्हते. घाबरून मी त्यादिवशी त्यांना भेटायला नकार दिला. पण त्यांनी मला पुन्हा काही दिवसांनी भेटायला बोलावले आणि माझे फोटो मागितले. ते फोटो दाखवल्यानंतर त्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्टच्या फोटोची मागणी केली होती. मला त्यावेळी प्रचंड राग आला होता. पण विकास गुप्ता मला इंडस्ट्रीमध्ये ब्लॉक करतील या भीतीने मी कोणाला याविषयी सांगितले नाही.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'He wanted to see my private parts': 'Roadies 9' winner Vikas Khoker accuses Vikas Gupta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.