सगळीकडे सध्या त्यांच्या लग्नाचीच चर्चा ऐकायला मिळत आहे. जिथे जावे तिथे त्यांच्या लग्नाची उत्सुकता सा-यांमध्ये पाहायला मिळत आहे. ज्या गोष्टीचे आपण सारे वाट पाहात होतो अखेर तो क्षण आला आणि त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून सा-यांनीच हा आनंद साजरा केलाय. कारण रंगणारा विवाह सोहळा हा रिअल नसून रिल असणार आहे. 

 

 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेमध्ये  अनु ( मृणाल दुसानीस ) आणि सिद्धार्थ( शशांक केतकर) ही जोडी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. या दोघांमध्ये चांगल्या केमिस्ट्रीमुळेच रसिकांनाही जोडी रोमँटीक वाटू लागली आणि रसिकांनाही या दोघांचा ऑनस्क्रीन लग्नसोहळा पाहायला मिळावा असे वाटत होते. त्यामुळे आता मालिकेत लवकरच लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळणार आहे. रिअल लग्नाप्रमाणेच हे लग्न पार पडणार आहे. लग्नात सगळ्या विधी पार पडल्या जाणार आहेत सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख... नऊवारी साडी, चंद्रकोर, हिरवा चुडा, मंगळसूत्र या लुकमध्ये  अनु खूप सुंदर दिसत आहे.

अनु तिच्या भूतकाळातील सगळ्या आठवणी, अवीबरोबरचे नाते मागे ठेऊन सिद्धार्थच्या प्रेमाखातर लग्नासाठी होकार देते. सिद्धार्थला मिळणार आहे अनुची साथ त्यामुळे मालिकेमध्ये या दोघांच्या आयुष्यात आता सुखाच्या सरी येणार हे नक्की ! 


'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली. मालिकेत नवनवीन घडणारे ट्वीस्ट यामुळे रसिकांचे तुफान मनोरंजन करत आहे. मालिकेने प्रेक्षकांना आपलेसे करून बघता बघता तब्बल १५० अधिक भागांचा पल्ला गाठला आहे. मृणालने नुकताच तिच्या इंस्टावर १५० भाग पूर्ण केले होचे त्याचवेळी  शशांक आणि तिचा एक सुंदर फोटो पोस्ट केला होता. आता मालिकेमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच रंजक वळणं पाहायला मिळणार  आहेत. 

 

 

Web Title: He Mann Baware Wedding Special : Anu And Siddharth's Wedding Photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.