जवळपास १३ वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आज तुमच्या लाडक्या पात्रांच्या खऱ्या लाइफ पार्टनरबद्दल तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.


तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत जेठालालचे वडील बापूजी म्हणजेच चंपक लालची भूमिका साकारणारे अमित भट्ट खऱ्या आयुष्यात खूप तरूण आणि हॅण्डसम आहेत. मालिकेत त्याची जेठालालसोबतची तू तू मैं मैं प्रेक्षकांना खूप भावते. अमिता भट्टच्या पत्नीचे नाव कृति भट्ट आहे आणि त्यांना जुळी मुले आहेत. कृति ही एक गृहिणी आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा अभिनेत्यासोबत कवी, कॉमेडियन आणि लेखक आहेत. त्यांच्या पत्नीबद्दल सांगायचे तर त्यांचे नाव स्वाती लोढा आहे. त्या लेखिका आहेत. त्यांना एक मुलगी आहे जिचे नाव स्वरा आहे. तीदेखील लेखिका आहे.

जेठालाल म्हणजेच दिलीप जोशीचा कॉमेडी सेन्स लोकांना खूप भावतो. खऱ्या आयुष्यात दिलीप जोशी खूप साधे आणि शांत स्वभावाचे व्यक्ती आहेत. ते सोशल मीडियापासून लांब आहेत. मीडिया रिपोर्टनुसार दिलीप जोशीच्या पत्नीचे नाव जयमाला जोशी आहे. त्या एक गृहिणी आहेत. त्यांना दोन मुले आहेत नियती आणि ऋत्विक.

मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानीने लोकांच्या मनात घर केले आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीपासून दिशा मालिकेतून गायब आहे आणि ती मालिकेत कमबॅक करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दिशाच्या पतीचे नाव मयुर असून ते बिझनेसमन आहेत.

दिशाला मयुर यांच्यासोबत पहिल्याच नजरेत प्रेम झाले होते. दिशा करियरच्या यशाच्या शिखरावर असताना तिने त्यांच्यासोबत लग्न करायचा निर्णय घेतला. दोघांनी सीक्रेट पद्धतीने लग्न केले. २०१७ साली दिशाने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला आणि त्यासाठी तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Have you seen the real life partners of the characters in 'Taraq Mehta Ka ...'? Find out about them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.