Have you seen the real family photos of om in yeu kashi tashi mi nandayla ?, viral on social media | 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील ओमच्या खऱ्या फॅमिली फोटो पाहिलात का ?, सोशल मीडियावर व्हायरल

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील ओमच्या खऱ्या फॅमिली फोटो पाहिलात का ?, सोशल मीडियावर व्हायरल

प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे 15 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत सरकारकडून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. परिणामी सध्या मालिका आणि सिनेमाचे शूटिंग ही बंद आहे. त्यामुळे काही कलाकरांनी आपल्या घरची वाट धरली आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील ओम थेट पुण्याला आपल्या घरी गेला आहे.  ओम अभिनेता शाल्व किंजवडेकर मुळचा पुण्याचा आहे त्यामुळे घरापासून दूर मुंबईत मालिकेचं शूटिंग तो करत होता. पण शासनाकडून लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे शूटिंग सध्या थांबली आहे. त्यामुळे तो आपल्या पुण्यातला घरी जाऊन पोहोचला आहे. 

शाल्वच्या बाबा चारु किंजवडेकर यांनी इंस्टाग्रामवर ओम घरी आपल्याचा फोटो शेअर केला आहे. खूप दिवसांनी ओम घरी आला आहे असं कॅप्शन त्यांनी या फोटोसोबत दिले आहे. शाल्वचा कुटुंबीयांसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. शाल्वचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या प्रत्येक पोस्टवर त्याचे चाहते लाईक्सचा वर्षाव करत असतात.


 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिका दिवसेंदिवस रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. अल्पावधीतच हि मालिका लोकप्रिय झाली. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. ‘अन्विता फलटणकर’ आणि ‘शाल्व किंजवडेकर’ ह्या फ्रेश जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली .

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Have you seen the real family photos of om in yeu kashi tashi mi nandayla ?, viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.