फरशी साफ करतेय ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरी, डान्स व्हिडीओ प्रमाणे हा व्हिडीओही होतोय प्रचंड व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 08:31 PM2021-05-06T20:31:46+5:302021-05-06T20:34:46+5:30

कोणी वर्कआऊट करतंय तर कोणी घरातले काम करण्यात व्यस्त आहे.सोशल मीडियावर पुन्हा एकदा कलाकार मंडळी लॉकडाऊन दरम्यान कोणत्या गोष्टी करतायेत त्याचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहेत.

Haryanvi Queen Sapna Choudhary cleaning floor on her latest song video goes viral | फरशी साफ करतेय ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरी, डान्स व्हिडीओ प्रमाणे हा व्हिडीओही होतोय प्रचंड व्हायरल

फरशी साफ करतेय ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरी, डान्स व्हिडीओ प्रमाणे हा व्हिडीओही होतोय प्रचंड व्हायरल

Next

सपना चौधरी 'बिग बॉस 11' मध्ये झळकल्यानंतर प्रकाशझोतात आली होती. बिग बॉसनंतर तिची लोकप्रियता प्रचंड वाढली.गेल्याच वर्षी वीर साहू यांनी सपना आणि त्यांच्या लग्नाचा खुलासा केला होता. जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी यावर्षी जानेवारीत लग्न केले होते.ऑक्टोबर महिन्यात सपनाने मुलाला जन्म दिला होता. आई झाल्यानंतर सपनाने आपले वाढलेले वजन कमी केले असून ती पुर्वी प्रमाणेच ग्लॅमरस दिसते.  अलीकडेच तिने एक फोटोशूटही केले आहे ज्यात तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

सोशल मीडियावरही सपना चौधरी प्रचंड सक्रीय असते. प्रत्येक गोष्ट चाहत्यांसोबत ती शेअर करते. सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले आहे.  पुन्हा एकदा सारेच घरात बंदिस्त झाले आहेत. मिळालेल्या वेळेत कलाकार वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतायेत. कोणी वर्कआऊट करतंय तर कोणी घरातले काम करण्यात व्यस्त आहे.

सोशल मीडियावर पुन्हा एकदा कलाकार मंडळी लॉकडाऊन दरम्यान कोणत्या गोष्टी करतायेत त्याचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. अशात हरियाणवी डान्सिंग क्वीन सपना चौधरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


घरात वेळच वेळ असल्याने स्वतः काम करत वेळ घालवत आहे. घरात फरशी साफ करताना दिसत आहे. एरव्ही सपना चौधरीचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असतात. आता घरकाम करणारे व्हिडीओ देखील धुमाकुळ घालत आहेत. एरव्ही स्टायलिश अंदाजात दिसणारी सपना घरातले काम करताना मात्र अगदी साधे कपड्यांमध्ये दिसतेय.  घरातले काम, मुलाचा सांभाळ करण्याबरोबरच ती तिच्या फिटनेसवरही लक्ष देत आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Haryanvi Queen Sapna Choudhary cleaning floor on her latest song video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app