प्रेक्षकांचा लाडका मॉनिटर म्हणजेच हर्षद सूर नवा ध्यास नवामध्ये सादर करणार हे गाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 06:30 AM2019-12-30T06:30:00+5:302019-12-30T06:30:01+5:30

सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचा आगामी भाग खास असणार आहे.

harshad monitor will sing khaike paan banaras wala in sur nava dhyas nava | प्रेक्षकांचा लाडका मॉनिटर म्हणजेच हर्षद सूर नवा ध्यास नवामध्ये सादर करणार हे गाणे

प्रेक्षकांचा लाडका मॉनिटर म्हणजेच हर्षद सूर नवा ध्यास नवामध्ये सादर करणार हे गाणे

googlenewsNext
ठळक मुद्देहर्षद अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटातील खइके पान बनारस वाला हे गाणे सादर करणार आहे आणि या गाण्यासाठी त्याने खास तसाच लुक देखील केला आहे

नूतन वर्षाची चाहूल आपल्या सगळ्यांनाच डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासूनच लागते... नवीन वर्षाचे स्वागत करण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे... सरत्या वर्षाने आपल्याला काय काय दिले?  आपल्या वर्षभराच्या वाटचालीवर आपण एक नजर टाकतो... डिसेंबर महिना सुरू होताच आपल्याला नव्या वर्षाचे वेध लागलेले असतात... सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमामध्ये देखील नवीन वर्षाचे धुमधडाक्यात स्वागत होणार आहे... आणि या विशेष भागामध्ये सूरवीरांना साथ मिळणार आहे  कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांची... म्हणजेच गाण्यांसोबत धमाल – मस्ती होणारच... 

बाळूमामाच्या नावाने चांगभलं आणि राजा रानीची गं जोडी मालिकेतील कलाकार या विशेष भागामध्ये सहभागी होणार आहेत... गाण्यांच्या सुरेल मैफिलीबरोबरच आपल्या लाडक्या मॉनिटरची म्हणजेच हर्षद नायबळची शाळा देखील भरणार आहे... सूर नवा ध्यास नवा मध्ये सुरवीरांनी एकापेक्षा एक गाणी सादर करून सगळ्यांची मने जिंकलीच पण राजा रानीची गं जोडी मालिकेमधील अजित ढाले पाटील यांची भूमिका साकारणार्‍या अजय पूरकर तसेच मिनाक्षी राठोड यांनी देखील सुंदर गाणी सादर केली. 

स्पृहा आणि हर्षद यांच्या धम्माल मस्तीने भागा अजूनच रंगतदार होणार आहे यात शंका नाही. इतकेच नसून हर्षद अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटातील खइके पान बनारस वाला हे गाणे सादर करणार आहे आणि या गाण्यासाठी त्याने खास तसाच लुक देखील केला आहे आणि त्यामध्ये खूपच गोड दिसतो आहे. 

Web Title: harshad monitor will sing khaike paan banaras wala in sur nava dhyas nava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.