ठळक मुद्दे2017 मध्ये बिग बॉसचे 11 वे सीझन जिंकल्यानंतर शिल्पा ‘पटेल की पंजाबी शादी में’ या चित्रपटात एक डान्स नंबर करताना दिसली.

‘भाबीजी घर पर है’ची अंगुरी भाभी आणि ‘बिग बॉस 11’ची विजेती शिल्पा शिंदे हिचा आज वाढदिवस. आपल्या परखड स्वभावासाठी ओळखली जाणारी शिल्पा आज 42 वर्षांची झाली. या वयातही ती सिंगल आहे आणि खरे सांगायचे तर सध्या तरी लग्न करण्याच्या मूडमध्ये नाहीये. हीच शिल्पा एकेकाळी अभिनेता रोमित राजसोबत लग्न करणार होती. लग्नाच्या निमंत्रणपत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. परंतु अचानक हे लग्न मोडले. यानंतर सात वर्षांनी हे लग्न मोडण्याचे कारण शिल्पाने सांगितले होते.

शिल्पा आणि रोमित यांनी मायका आणि मात-पिता के चरणों में स्वर्ग या मालिकेत एकत्र काम केले होते.  2007 मध्ये मायकाच्या सेटवर शिल्पा व रोमित एकमेकांच्या प्रेमात पडले आणि वर्षभरात दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2009 मध्ये गोव्यात लग्न करण्याचे ठरले, लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या. पण अचानक असे काही झाले की, शिल्पाने स्वत: हे लग्न मोडले. ‘करवा चौथ’च्या दोन दिवस आधी हे लग्न मोडले.

 सात वर्षांनंतर एका मुलाखतीत बोलताना शिल्पाने यामागचे कारण सांगितले होते. ‘करवा चौथच्या दोन दिवस आधी रोमित तडजोड करणारा पती होऊ शकत नाही, हे मला कळले. रोमितच्या कुटुंबासाठी मी खूप काही केले. पण त्याने कधीच अ‍ॅडजस्ट केले नाही. याऊलट माझ्या कुटुंबाचा अपमान केला. माझी अडचण समजून न घेता त्याने माझ्या कुटुंबाचा अपमान केला. म्हणून मी लग्न मोडणेच योग्य समजले,’ असे शिल्पाने या मुलाखतीत सांगितले होते. 

2017 मध्ये बिग बॉसचे 11 वे सीझन जिंकल्यानंतर शिल्पा ‘पटेल की पंजाबी शादी में’ या चित्रपटात एक डान्स नंबर करताना दिसली. यानंतर तिने काही रिअ‍ॅलिटी शो केलेत. पण यापेक्षा कुठलेही मोठे यश तिच्या पदरी पडले नाही. कामापेक्षा वेगवेगळ्या मुद्यावरच्या वक्तव्यांमुळेच ती अधिक चर्चेत राहिली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: happy birthday shilpa shinde know her marriage facts with romit raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.