gulshan grover told lots of secrets about chunky pandey in the kapil sharma show season 2 | द कपिल शर्मा शोमध्ये गुलशन ग्रोव्हरने सांगितले, हा अभिनेता आहे सगळ्यात जास्त कंजूष
द कपिल शर्मा शोमध्ये गुलशन ग्रोव्हरने सांगितले, हा अभिनेता आहे सगळ्यात जास्त कंजूष

ठळक मुद्देचंकी पांडे खूपच कंजूष आहे. त्याच्या हातातून एक रुपया देखील कधी सुटत नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण त्याच्या घरात तो ज्या काही पार्टी आयोजित करायचा, त्या पार्टींना देखील कोणी ना कोणी तरी स्पॉन्सर असायचा.

कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. कपिल शर्मा सोबतच कृष्णा अभिषेक, भारती सिंग, किकू शारदा, अर्चना पुरणसिंग यांसारखे कलाकार या शो चा भाग आहेत.  

द कपिल शर्मा शो मध्ये प्रत्येक आठवड्यात विविध क्षेत्रातील काही मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिवूडमधील अनेकजण या कार्यक्रमात आजवर येऊन गेले आहेत. आता या आठवड्यात बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध खलनायक हजेरी लावणार आहेत. बॉलिवूडचे खलनायक रणजीत, गुलशन ग्रोव्हर आणि किरण कुमार विनोदवीर कपिलसोबत या कार्यक्रमात खूप धमाल मस्ती करणार आहेत. तसेच कपिलसोबत गप्पा गोष्टी करत बॉलिवूडमधील अनेकांची पोलखोल करणार आहेत. त्यांच्याशी गप्पा मारताना कपिलने या खलनायकांना विचारले की, बॉलिवूडमधील कोणता अभिनेता सगळ्यात जास्त कंजूष आहे.


त्यावर गुलशन ग्रोव्हरने क्षणाचाही विचार न करता सांगितले की, चंकी पांडे खूपच कंजूष आहे. त्याच्या हातातून एक रुपया देखील कधी सुटत नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण त्याच्या घरात तो ज्या काही पार्टी आयोजित करायचा, त्या पार्टींना देखील कोणी ना कोणी तरी स्पॉन्सर असायचा. त्याच्या लग्नाचा खर्च देखील त्याने स्पॉन्सरर्सकडून करून घेतला होता. त्याने एकदा एक पार्टी आयोजित केली होती, त्या पार्टीत मला अनेक अनोळखी चेहरे दिसत होते. त्या सगळ्यांना पाहून हे कोण आहेत असा प्रश्न मला पडला होता. चंकीने काही वेळानंतर मला या लोकांना भेटवले आणि या लोकांनी ही पार्टी स्पॉन्सर केली असल्याचे मला सांगितले. मला हे सगळे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला होता. 

द कपिल शर्मा शोच्या या भागात यासोबतच डिंपल कपाडिया, नसिरुद्दीन शाह, सनी देओल, शत्रुघ्न सिन्हा अशा विविध बॉलिवूड अभिनेत्यांबद्दलचे किस्से गुलशन ग्रोव्हर सांगणार आहे. द कपिल शर्मा शो हा भाग प्रेक्षकांना शनिवार आणि रविवार रात्री 9:30 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. 

Web Title: gulshan grover told lots of secrets about chunky pandey in the kapil sharma show season 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.