ठळक मुद्देचित्रीकरण पूर्ण न झाल्याने गुलशनला दुसर्‍या चित्रीकरणासाठी जाता आले नव्हते. शत्रुघ्नने जेव्हा त्याला नाराज झालेले पहिले, तेव्हा त्याने त्याला बोलावून सांगितले की, मी तुझी शिफारस आणखी चार ते पाच चित्रपटांसाठी करेल. पण मला फक्त वेळेवर येण्यासाठी सांगू नकोस

कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. कपिल शर्मा सोबतच कृष्णा अभिषेक, भारती सिंग, किकू शारदा, अर्चना पुरणसिंग यांसारखे कलाकार या शो चा भाग आहेत.  

द कपिल शर्मा शो मध्ये प्रत्येक आठवड्यात विविध क्षेत्रातील काही मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिवूडमधील अनेकजण या कार्यक्रमात आजवर येऊन गेले आहेत. आता या आठवड्यात बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध खलनायक हजेरी लावणार आहेत. बॉलिवूडचे खलनायक रणजीत, गुलशन ग्रोव्हर आणि किरण कुमार विनोदवीर कपिलसोबत या कार्यक्रमात गप्पा गोष्टी करणार आहेत. त्यांच्याशी गप्पा मारताना कपिलने या खलनायकांना विचारले की, कोणता अभिनेता सेटवर नेहमी उशिरा यायचा. त्यावर गुलशन ग्रोव्हरने गंमतीत उत्तर दिले की, चित्रीकरणासाठी सेटवर येणार्‍या लोकांमध्ये शत्रुघ्न सिन्हा हा सगळ्यात शेवटी पोहोचणारा अभिनेता असायचा. 

गुलशनने पुढे सांगितले की, तो शत्रुघ्नसोबत चित्रीकरण करत होता. त्याला दुसर्‍या दिवशी दुपारी दोन वाजता दुसर्‍या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जायचे होते. त्याने शत्रुघ्न सिन्हाला विनंती केली होती की, दुसर्‍या दिवशी तो जर दुपारी बारा पर्यंत पोहोचला तर तो या दुसर्‍या चित्रीकरणासाठी वेळेवर जाऊ शकेल. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा वेळेवर यायला तयार झाला. पण तरीही शूटिंग ठिकाणी तो  साडे चार पाच वाजता आला. त्यामुळे गुलशन ग्रोव्हर चांगलाच नाराज झाला. कारण चित्रीकरण पूर्ण न झाल्याने त्याला दुसर्‍या चित्रीकरणासाठी जाता आले नव्हते. शत्रुघ्नने जेव्हा त्याला नाराज झालेले पहिले, तेव्हा त्याने त्याला बोलावून सांगितले की, मी तुझी शिफारस आणखी चार ते पाच चित्रपटांसाठी करेल. पण मला फक्त वेळेवर येण्यासाठी सांगू नकोस.”

या भागात यासोबतच डिंपल कपाडिया, नसिरुद्दीन शाह, सनी देओल अशा विविध बॉलिवूड अभिनेत्यांबद्दलचे किस्से गुलशन ग्रोव्हर सांगणार आहे. द कपिल शर्मा शो हा भाग प्रेक्षकांना प्रत्येक शनिवार आणि रविवार रात्री 9:30 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.


Web Title: Gulshan Grover humorously tags Shatrughan Sinha as a "Late comer" on the film sets on The Kapil Sharma Show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.