'बिग बॉस 7'ची विजेती गौहर खान सध्या तिच्या लग्नाला घेऊन चर्चेत आहे. गौहर 24 डिसेंबरला बॉयफ्रेंड जैद दरबारसोबत लग्न करणार आहे. दोघांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. याच दरम्यान गौहर जैदसोबत मिनी व्हॅकेशनसाठी दुबईला गेली आहे. दोघांचा फोटोसमोर आला आहे.  

जैद दरबारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गौहरसोबतचा दुबईतला फोटो पोस्ट केला आहे. गौहरने यात ब्लॅक कलरचा टी-शर्ट आणि पिवळ्या रंगाची पॅंट घातली आहे तर जैदने जीन्स आणि टी-शर्टसोबत सिंपल लूकमध्ये दिसतोय. हाय दुबई. मी परत आलो आहे यावेळी माझ्यासोबत माझी जोडीदार गौहर खानसुद्धा आहे. 

जैद दरबार हा संगीतकार इस्माल दरबार यांचा मुलगा आहे. तसेच तो एक कोरिओग्राफर आहे.रिपोर्टनुसार, मुंबईच्या एका हॉटेलात सगळे फंक्शन होणार आहेत. 3 दिवस हा सोहळा चालणार आहे. काही दिवसांपूर्वीच गौहर जैदसोबत गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी गेली. गोव्याची ही ट्रिप प्री-वेडिंग फोटोशूटसाठी खास प्लान करण्यात आली होती, असे कळते. सोशल मीडियावर गौहरने साखरपुड्याची अंगठी फ्लॉन्ट केली होती.

अभिनेत्री असण्यासोबतच ती एक मॉडेल सुद्धा आहे. गौहरचा जन्म महाराष्ट्रात असलेल्या पुण्यातील एक मुस्लीम कुटुंबामध्ये 23 आॅगस्ट 1983 मध्ये झाला. गौहरने 2009मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. रॉकेट सिंग, सेल्ममॅन आॅफ द इअर चित्रपटात गौहर दिसली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gauhar khan arrives dubai with boyfriend zaid darbar before marriage pictures of mini holiday with humsafar came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.