funny video kapil sharma take money for the promotion of the film from ajay devgan | what? ‘तानाजी’च्या प्रमोशनसाठी कपिल शर्माने घेतले पैसै?  पाहा व्हिडीओ
what? ‘तानाजी’च्या प्रमोशनसाठी कपिल शर्माने घेतले पैसै?  पाहा व्हिडीओ

ठळक मुद्दे 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

कॉमेडीकिंग कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ सगळ्यांचा आवडता कॉमेडी शो आहे. त्यामुळे बॉलिवूडचे बडे-बडे स्टार्स कपिलच्या शोमध्ये प्रमोशनसाठी येतात. अभिनेता अजय देवगणही त्याचा आगामी सिनेमा ‘तानाजी-द अनसंग वॉरियर’च्या प्रमोशनसाठी या शोमध्ये पोहोचला. पण यादरम्यान असे काही झाले की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडिओत कपिल ‘तानाजी’ या सिनेमाचे कौतुक करताना शिवाय प्रेक्षकांना हा सिनेमा पाहण्याची विनंती करताना दिसतोय.

याचदरम्यान अजय देवगण तेथे येतो आणि कॅमे-याकडे इशारा करत,‘कॅमेरा बंद करा’ असे म्हणतो. यानंतर अजय कपिलच्या हातात काही पैसे देतो आणि त्याचे आभार मानतो. हे पैसे पाहिल्यावर ‘आपली डील 1200 मध्ये झाली होती,’ असे कपिल अजयला म्हणतो. यावर इतक्यात अ‍ॅडजस्ट करण्यास म्हणतो. यानंतर कपिल पैसे थेट खिशात टाकतो आणि निघतो. कपिल व अजयचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. पण अर्थात कपिलच्या कॉमेडी शोप्रमाणेच हा व्हिडीओही ‘कॉमेडी’चा एक भाग आहे. 


होय, कपिलने स्वत: हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. तूर्तास चाहते या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.  10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: funny video kapil sharma take money for the promotion of the film from ajay devgan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.