First Time Ekta Kapoor with her son Ravie Kapoor on his first birthday bash | एकता कपूरच्या मुलाचा बालहट्ट कॅमे-यात कैद, पहिल्यांदाच आई-मुलाची जोडी आली समोर

एकता कपूरच्या मुलाचा बालहट्ट कॅमे-यात कैद, पहिल्यांदाच आई-मुलाची जोडी आली समोर

सध्या सर्वत्रच सोशल मीडियावर फक्त स्टारकिड्सची चर्चा होत असते. ही सगळी स्टारकिड्स सोशल मीडियावर बरेच सक्रिय आहेत. मात्र काही स्टारकिड्स काही दोन वर्षाचे आहेत तर काही नुकतेच चालायला बोलायला शिकले आहेत. आपल्या मुलांची झलक आपल्या चाहत्यांनाही पाहाता यावी म्हणून कलाकारमंडळी सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करतात. पहिल्यांदाच एकता कपूरही आपल्या मुलासह मीडियासमोर आली. निमित्त होते मुलाच्या पहिला वाढदिवसाचे. एकताच्या मुलाचे नाव रवी आहे. 


इतक्या दिवसात रवीचा एकही असा फोटो मीडिया समोर आला नव्हता. पण रवीच्या वाढदिवशी मात्र  आई एकतासह तो पहिल्यांदा कॅमे-यात कैद झाला. त्यामुळे रवीच्या बाललीला सध्या प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतोय. एकता कपूरचा वंडरबॉय रवी अतिशय स्टायलिश अंदाजात दिसला. तसेच आई एकताने त्याला कुशीत  घेताच चिमुकल्या रवीचा बालहट्ट असा काही होता की त्याचा सांभाळ करणा-या केअरटेकरलाही तो सांभाळणं कठीण झालं होतं. याच बाललीलांचे काही फोटो समोर आलेत हे ही नसे थोडके असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 


एकताला टीव्ही इंडस्ट्रीची ‘क्वीन’ म्हणून ओळखले जाते. १९९५ मध्ये टीव्ही आलेल्या एकता कपूर निर्मित ‘हम पांच’ या मालिकेने लोकप्रीयतेचा कळस गाळला. महिला गँगची ही मालिका लोकांना प्रचंड आवडली. या मालिकेची कल्पना एकताची होती. एकता व तिची आई शोभा कपूर यांनी साकारलेल्या बालाजी टेलिफिल्मने ही मालिका प्रोड्यूस केली आणि यानंतर एकताने कधीच मागे वळून पाहिले नाही. एकताने चाळीशी ओलांडली आहे आणि आजपर्यंत तिने ४० पेक्षा अधिक मालिका व चित्रपट प्रोड्यूस केले आहेत. तिच्या नावावर २० पेक्षा अधिक हिट मालिका आहेत. पण हम पांच , क्यों की सांस भी कभी बहू थी, कसौटी जिंदगी की, कहानी घर घर की आणि नागीन या पाच मालिकांनी एकताला ‘टीव्हीची क्वीन’ बनवले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: First Time Ekta Kapoor with her son Ravie Kapoor on his first birthday bash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.