गिन्नी चतरथ आणि कपिल शर्मा १२ डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. आणि 10 डिसेंबर 2019 ला  दोघांच्या आयुष्यात  एका गोंडस परीचं आगमन झालं. खुद्द कपिल शर्मानेच ही गुड न्यूज चाहत्यांसह शेअर केली होती. बाबा झालो, तुमचे आशिर्वाद असु द्या !  सांगताच पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. जवळपास महिन्याभरानंतर कपिलने आपल्या लेकीचा फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे. हा फोटो पाहून तुम्हीसुद्धा त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहाणार नाही.


या फोटोमध्ये बाप-लेकीचे प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच मुलीला पहिल्यांदा मिठीत घेताना कपिल भावूकही झाला होता.मुलीचे फोटो पाहून ती इतकी क्यूट आहे की, चाहते तिची प्रशंसा करताना थकत नाहीयेत. बाप लेकीचा प्रेमळ फोटो तुमचंही मन जिंकेल यांत काही शंकाच नाही.


आपल्या कॉमिक टाइमिंगने कपिल शर्माने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. 'किस किसको प्यार करूं' या सिनेमातून कपिलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.


त्यानंतर तो 'फिरंगी' या सिनेमातही पहायला मिळाला. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या सिनेमांना हवी तितकी दाद दिली नाही. 

Web Title: First pics of Kapil Sharma and Ginni Chatrath’s Baby Girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.