झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला, अग्गंबाई सासूबाई आणि माझा होशील ना या मालिकांनी अल्पावधीत रसिकांची मनं जिंकली आहेत. या पैकी एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. या मालिकेवर, यातील पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजते आहे. 


या मालिकेच्या जागी येत्या २ नोव्हेंबरपासून वाघोबा प्रॉडक्शनची कारभारी लय भारी ही मालिका प्रसारित होणार आहे आहे. या मालिकेत लागिर झालं जी या मालिकेत विक्याची भूमिका साकारणारा निखिल चव्हाण मुख्य भूमिका साकारतो आहे. तर मुख्य नायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री अनुष्का सरकटे दिसणार आहे.

कारभारी लयभारी मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये एका राजकीय पक्षाची सभा आणि त्या सभेला संबोधित करणारा नेता दाखवण्यात आला होता. 'कारभारी लयभारी' या झी मराठीवरच्या नवीन मालिकेच्या प्रोमो रिलीजनंतर मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकाराची उभे राहण्याची आणि भाषणाची स्टाईल पाहता ही मालिका राजकारणावर भाष्य करणारी आहे असा तर्क लावत अनेकांनी लावला होता.

ही राजकारणाची जोड असणारी एक प्रेमकहाणी आहे हेसुद्धा व्हिडिओ पाहून लक्षात येत आहे. तेव्हा आता प्रेम आणि राजकारणाची सांगड घालणारी ही मालिका येत्या काळात प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात कितपत यशस्वी ठरते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Farewell to the viewers who will take this popular series on Zee Marathi after Khel Rat Chale 2 at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.