लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा दुसऱ्या सीझनने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यंदाच्या सीझनचे विजतेपद शिव ठाकरेनं पटकावलं आहे. त्याला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि १७ लाख रुपये मिळाले आहेत. शिव हाच बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमाचा विजेता ठरेल असा अंदाज कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासूनच लावला जात होता. शिवला या शोमुळे चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळतं आहे. त्याला याची प्रचिती सातत्याने येताना दिसते आहे. मात्र नुकत्याच एका इव्हेंटमध्ये शिव व वीणा यांनी हजेरी लावली होती. तिथे या दोघांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. मात्र तिथे आलेल्या शिवच्या चाहतीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 

शिव ठाकरे व वीणा जगताप यांनी डोंबिवलीतील नवरात्रौत्सव मंडळाला भेट दिली. तिथल्या चाहत्यांचे प्रेम पाहून ते दोघे चकीत झाले.


मात्र शिवच्या एका चाहतीला त्याला पाहून अश्रू अनावर झाले. तिचा हा व्हिडिओ शिवने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

या व्हिडिओत त्याने लिहिलंय की नको रडूस, तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता तेच खूप आहे.


यंदाच्या सीझनमध्ये शिव ठाकरे व वीणा जगताप यांची लव्हस्टोरी खूप चर्चेत आली. त्यामुळे सीझनमध्ये शेवटच्या तीन सदस्यांमध्ये वीणा व शिव होते आणि या सीझनचा शिव विजेता ठरला. सीझन संपल्यानंतर शिव व वीणाचा रोमान्स संपेल, असं बोललं जातं होतं. मात्र तसं काही झालं नाही. उलट, त्या दोघांचं नातं बहरत चाललं आहे. त्यामुळे त्यांचे चाहतेही खूप खूश आहेत. त्यात आता त्यांचे चाहते त्यांची तुलना बॉलिवूडच्या कपलसोबत करत आहेत. 

शिव व वीणा दोघे लग्न करणार का हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.
 


Web Title: Fans Love ...! Shiv Thakre fans saw him and started crying, see this Video
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.