Indian Idol 12: दानिश व शन्मुखप्रियाला शोमधून बाहेर काढा! सोशल मीडियावर फॅन्सची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 10:50 AM2021-05-18T10:50:34+5:302021-05-18T10:51:19+5:30

‘इंडियन आयडल 12’ पुन्हा चर्चेत, दानिश व शन्मुखवर का भडकले युजर्स? जाणून घ्या काय आहे कारण 

fans demand to eliminate mohammad danish and shanmukha priya from indian idol 12 | Indian Idol 12: दानिश व शन्मुखप्रियाला शोमधून बाहेर काढा! सोशल मीडियावर फॅन्सची मागणी

Indian Idol 12: दानिश व शन्मुखप्रियाला शोमधून बाहेर काढा! सोशल मीडियावर फॅन्सची मागणी

Next
ठळक मुद्देकिशोर कुमार स्पेशल एपिसोडमध्ये किशोर कुमार यांचे चिरंजीव अमित कुमार स्पेशल गेस्ट बनून आले होते. त्यांनीही या एपिसोडवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती.

गेल्या काही दिवसांत ‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12) या सिंगींग रिअ‍ॅलिटी शोने अनेक वाद ओढवून घेतले. अलीकडे ‘किशोर कुमार स्पेशल एपिसोड’ (Kishore Kumar) या शोवर बरीच टीका झाली. आता या शोच्या दोन स्पर्धकांना शोमधून बाहेर करा, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. हे दोन स्पर्धक कोण तर मोहम्मद दानिश (Mohammad Danish) आणि शन्मुख प्रिया  (Shanmukha Priya). होय, दानिश व शन्मुख यांच्यामुळे ‘इंडियन आयडल 12’ने नवा वाद ओढवून घेतला आहे.

आता या दोघांनी काय केले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे कारण आहे, त्यांचा परफॉर्मन्स. सोशल मीडियावरच्या युजर्सच्या मते, शन्मुख व दानिश केवळ एकाच जॉनरची गाणी गातात, त्यांना दुसरे काहीही येत नाही. शन्मुख केवळ किंचाळते, ओरडत आणि दानिश ओव्हरअ‍ॅक्टिंग करतो. याचमुळे या दोघांना शो बाहेर करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे.

‘इंडियन आयडल’चे सिंगर फक्त ओरडत आहेत, काही सिंगर्स तर नुसते किंचाळत आहेत, असे एका युजरने लिहिले आहे. अन्य एका युजरने तर प्लीज, प्लीज मेकर्स दानिश आणि शन्मुखप्रियाजा बाहेर काढा. खूप इरिटेटिंग आहे, यांचे गाणे सहन होत नाही, असे लिहित दोघांना ट्रोल केले आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावर अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत.

यापूर्वी ‘किशोर कुमार स्पेशल एपिसोड’मुळे शोचे जजेस नेहा कक्कर व हिमेश रेशमिया जबरदस्त ट्रोल झाले होते. या दोघांना या स्पेशल एपिसोडमध्ये किशोर कुमारची गाणी गाताना पाहून लोकांनी दोघांनाही जाम फैलावर घेतले होते. नेहा व हिमेशने किशोर कुमार यांच्या गाण्यांचा अक्षरश: बॅन्ड वाजवला, अशा प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या होत्या.

अमित कुमार यांनाही आवडला नव्हता एपिसोड
किशोर कुमार स्पेशल एपिसोडमध्ये किशोर कुमार यांचे चिरंजीव अमित कुमार स्पेशल गेस्ट बनून आले होते. त्यांनीही या एपिसोडवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. शूट सुरू होण्याआधीच स्पर्धक कसेही गायले तरी त्यांचे कौतुक करा, असे मला सांगण्यात आले होते. मला जे सांगितले गेले, तेच मी केले. मी फक्त पैशांसाठी या शोमध्ये गेलो होते, असे अमित कुमार म्हणाले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: fans demand to eliminate mohammad danish and shanmukha priya from indian idol 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app