Fans are rooting for my Sarpika look: Niyati | नजरमधील नियतीच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती

नजरमधील नियतीच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती

ठळक मुद्देसर्पिकाच्या रूपातील माझ्या प्रोमोबद्दल मी खूप खुश आहे

स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेतील विविध व्यक्तिरेखा आणि त्यांच्या भयंकर अवतारांमुळे आगामी भागांमध्ये कथानकात भीती आणि थरारकतेचा नवा अनुभव प्रेक्षकांना देत असल्याचे पाहायला मिळत आहे.  लवकरच या मालिकेत सर्पिका नावाच्या एका नव्या व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार असून त्यामुळे प्रेक्षकांना एक अनपेक्षित आश्चर्याचा धक्का बसणार आहे. 


नियती म्हणाली, “सर्पिकाच्या रूपातील माझ्या प्रोमोबद्दल मी खूप खुश आहे. प्रेक्षकांनाही तो आवडला आहे. मला खूप सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. मला आशा आहे की सर्पिकाच्या प्रवेशासह आणखी प्रेक्षकांना हा शो आवडेल.” नियती ह्या मालिकेत दैविक पियाची भूमिका करत असून स्टारप्लसवरील नजरमध्ये सर्पिकाच्या नवीन अवतारात दिसून येईल. प्रेक्षकही ह्या मालिकेत आणखी काय काय सरप्राईजेस पाहायला मिळणार आहेत याबद्दल उत्सुक आहेत.सर्पिकाच्या प्रवेशामुळे मालिकेत आता आणखी काही नवी रहस्य उलगडणार आहेत. त्यामुळे मालिका अधिकच रंजक होणार आहे असे दिसते. 'नजर' या मालिकेतील तरूण डायन रूबीवर नजर टाकल्यास तिचे ग्लॅमरस आणि मादक रूप नक्कीच तुमच्या नजरेत भरल्याशिवाय राहणार नाही. वेशभूषेबरोबरच अंगावरील विविध आभूषणे यांची निवड कधी कधी सोन्या स्वत:च करीत असते. 

'नजर'मधील सर्व कलाकारांमध्ये  सोन्या या अभिनेत्रीची वेशभूषा ही सर्वांत फॅशनेबल आहे. ती बरेचदा काही अफलातून शैलीदार कपड्यांत वावरताना दिसते. याबाबत सोन्या म्हणाली की, “मी साकार करीत असलेल्या रूबीच्या व्यक्तिरेखेला स्टाईल आणि फॅशन यांची उत्तम जाण असून ती अनेकदा अतिशय फॅशनेबल कपडे आणि आभूषणे परिधान करीत असते. 
 

Web Title: Fans are rooting for my Sarpika look: Niyati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.