Famous choreographer Dharmesh contracted corona, 18 people were infected on the set of 'Dance Deewane 3' | प्रसिद्ध कोरिओग्राफर धर्मेशला झाली कोरोनाची लागण, 'डान्स दीवाने ३'च्या सेटवर झाली होती १८ जणांना लागण

प्रसिद्ध कोरिओग्राफर धर्मेशला झाली कोरोनाची लागण, 'डान्स दीवाने ३'च्या सेटवर झाली होती १८ जणांना लागण

दमदार डान्स परफॉर्मन्समुळे छोट्या पडद्यावरील डान्स दीवाने ३ हा शो सगळीकडे चर्चेत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शोच्या सेटवरून धक्कादायक बातम्या समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी समोर आले होते की डान्स दिवाने ३च्या सेटवरील १८ क्रू मेंबरना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान आता या शोचा परिक्षक धर्मेश येलांडेला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे.

डान्स दिवाने ३ या शोमध्ये माधुरी दीक्षित, तुषार कालिया आणि धर्मेश येलांडे असे तीन परिक्षक आहेत तर राघव जुयाल या शोचे सूत्रसंचालन करतो. धर्मेशला कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार माधुरी आणि तुषार यांनी कोरोनाची टेस्ट केली पण ती निगेटिव्ह आली. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोच्या निर्मात्यांनी धर्मेशला कोरोना लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी काही दिवस धर्मेश शोमध्ये दिसणार नाही. कारण काही दिवसांपूर्वी सोनी टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये धर्मेश दिसत नाही आहे. त्याच्याऐवजी या प्रोमोमध्ये कोरिओग्राफर पुनीत पाठक आणि शक्ति मोहन दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यात रणबीर कपूर, आर. माधवन, मनोज वाजपेयी, आमिर खान, आलिया भट, फातिमा सना शेख, गोविंदा, अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, विकी कौशल, कतरिना कैफ या कलाकारांचा समावेश आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Famous choreographer Dharmesh contracted corona, 18 people were infected on the set of 'Dance Deewane 3'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.