Exclusive: Do you know why my husband's wife was playing the role of Shani in the series, which was offered to the actress? | Exclusive : ​तुम्हाला माहिती आहे का माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनायाची भूमिका या अभिनेत्रीला करण्यात आली होती ऑफर?

Exclusive : ​तुम्हाला माहिती आहे का माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनायाची भूमिका या अभिनेत्रीला करण्यात आली होती ऑफर?

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. ही व्यक्तिरेखा रसिका सुनील साकारत असून या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेत शनायाच्या भूमिकेसाठी आधी शर्मिला राजारामला विचारण्यात आले होते. पण तिने या भूमिकेसाठी नकार दिल्याने या भूमिकेसाठी रसिकाची निवड करण्यात आली.
शर्मिला शिंदेने पुढचे पाऊल या मालिकेत काम केले होते. तिने या मालिकेत साकारलेली रूपाली ही भूमिका प्रचंड गाजली होती. त्यामुळे तिला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेसाठी विचारण्यात आले होते. याविषयी शर्मिला सांगते, शनायाच्या भूमिकेसाठी मला अनेकवेळा विचारण्यात आले होते. खरं तर एक कलाकार म्हणून माझ्यासाठी ती खूपच चांगली संधी होती. पण तरीही मी माझ्या काळजावर दगड ठेवून या भूमिकेसाठी नकार दिला. मला भविष्यात हिंदी मालिकेत चांगल्या भूमिका साकारण्याची इच्छा असल्यानेच मी शनाया ही भूमिका न करण्याचे ठरवले. मी मराठीत खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पण एक कलाकार म्हणून मला वेगवेगळ्या भाषेतही काम करायचे आहे. मराठीत मी व्यग्र असल्यास मला हिंदी मालिकांमध्ये काम करणे शक्य नव्हते. त्यामुळेच मला हा अतिशय कठीण निर्णय घ्यावा लागला. मी भविष्याचा विचार करूनच शनायाच्या भूमिकेसाठी नकार दिला आणि शनायाऐवजी या मालिकेत जेनीची भूमिका साकारण्याचे ठरवले. मी इतकी प्रसिद्ध अभिनेत्री असूनही छोटीशी भूमिका का साकारतेय हा प्रश्न नेहमीच माझ्या चाहत्यांना पडतो. पण मी शनायाची भूमिका न करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता असे माझे फॅन्स आता नक्कीच बोलतील. कारण मी लवकरच एका हिंदी मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत मी चिऊताई ही भूमिका साकारणार असून सोनी या प्रसिद्ध वाहिनीवर प्रेक्षकांना माझी मालिका पाहाता येणार आहे.

sharmila rajaram


shanaya and jenny

Also Read : माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनील बनली गायिका, ऐका तिने गायलेले हे गाणे

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Exclusive: Do you know why my husband's wife was playing the role of Shani in the series, which was offered to the actress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.