नच बलिये 9 मधून या आठवड्यात उर्वशी ढोलकिया आणि अऩुज सचदेवा ही जोडी बाहेर गेली. तर एक्स कपल विशाल आदित्य सिंग आणि मधुरिमा तुली एलिमिनेशनपासून सुरक्षित झाले. आजतकच्या रिपोर्टनुसार या आठवड्यात शोमधून विवादित जोडी मधुरिमा-विशाल बाहेर होणार आहेत.     

रिपोर्टनुसार येणाऱ्या आठवड्यात मधुरिमा आणि विशाल बाहेर जाणार आहे. बॉटम 2 मध्ये पोहोचलेल्या या एक्स कपलसोबत श्रद्धा आर्या आणि आलम मक्कडला कमी वोट्स मिळाले होते. डान्सच्याबातीत विशाल आणि मधुरिमा चांगले कपल होते मात्र कमी मतं मिळाल्यामुळे त्यांना शोच्या बाहेर जावं लागले. 

या रिझल्टमुळे परीक्षकांनाही धक्का बसला. मधुरिमा आणि विशालची जोडी शोमध्ये सगळ्यात विवादीत जोडी होती. प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांच्यामध्ये वाद व्हायचे. रिहर्सल दरम्यान मधुरिमाने विशालवर हातदेखील उचलला होता.  विशालने काही दिवसांपूर्वी शो सोडण्याची धमकी दिली होती. अशी धमकी तो सगळ्यांचे लक्ष वेधण्यासाठी करतो असे मधुरिमाचे म्हणणे होते. 


मधुरिमा आणि विशाल चंद्राकांतामध्ये एकत्र दिसले होते. या मालिकेदरम्यान त्यांच्या रिलेशनशीपला सुरुवात झाली. मात्र दोघांचे नातं फारकाळ टिकले नाही आणि दोघांनी आपलं रस्ते बदलेले. आता दोघे नच बलियेमध्ये एकत्र दिसत होते आता त्यांचे तिथलं आवाहनही संपुष्टात आले.


Web Title: ex controversial couple madhurima tuli vishal aditya singh eliminated nach baliye 9
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.