Elaichi and Pancham struggle to celebrate Holi together on Sony SAB's Jijaji Chhat Per Hain | इलायची आणि पंचमचा होळी एकत्र साजरी करण्यासाठी आटापिटा

इलायची आणि पंचमचा होळी एकत्र साजरी करण्यासाठी आटापिटा

सोनी सब वाहिनीवरील 'जिजाजी छत पर हैं' या मालिकेची प्रेक्षकांमधील लोकप्रियता यात दाखवलेल्या गमतीशीर चुकामुकींमुळे तसेच खोडकरपणामुळे कायम आहे. आगामी काही भागांमध्ये इलायची, पंचम आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब होळी साजरी करण्यासाठी उत्साहाच्या रंगांमध्ये रंगणार आहे. पण त्यांच्या या उत्साहामध्ये काही अडचणीही निर्माण होणार आहेत.


होळीचा सण जवळ आला असल्याने सुनीता आणि इलायचीसाठी भेटवस्तू आणून त्यांना आश्चर्याचा धक्का देण्याचा बेत पंचम आणि पिंटू आखत आहेत. यासाठी मुरारीकडून पैसे मागताना त्यांनी पंचमची आजी वारल्याची थाप मारली आहे. आजी वारल्यामुळे होळी साजरी करायची नाही, असे मुरारीने जाहीर केल्यामुळे पंचम आणि पिंटू त्यांच्याच थापांच्या जाळ्यात अडकले आहेत. एकत्र होळी साजरी करता येणार नाही या बातमीने अस्वस्थ झालेली इलायची आता बेत आखत आहे, पंचमची आजी जिवंत आहे हे मुरालीला पटवून देण्याचा आणि त्यासाठी ते ललितला आजीचा वेश करायला लावणार आहेत. आजी जिवंत आहे हे पटल्यामुळे इलायची आणि करुणाला घेऊन होळी साजरी करण्यासाठी मेरठला जाण्याचे मुरारीने ठरवले आहे. आता अशा पार्श्वभूमीवर इलायची आणि पंचम यांना रंगांचा सण होळी एकत्र साजरा करता येईल का?
पंचमची भूमिका करणारा निखिल खुराना म्हणाला, “पंचम पूर्णपणे होळीच्या उत्साहात आहे आणि त्याला इलायचीला काहीतरी गिफ्ट द्यायचे आहे. पण याच प्रयत्नात सगळे काही फसत जाते आणि पंचम व इलायचीला होळी एकत्र साजरी करणे मुश्किल होऊन जाते. हे दोघे होळी एकत्र साजरी करण्यासाठी कसे झगडतात हे बघणे प्रेक्षकांसाठी गमतीचे असेल.”
इलायचीची भूमिका करणारी हिबा नवाब म्हणाली, “इलायची होळीबाबत आणि मुख्य म्हणजे ती पंचमसोबत साजरी करण्याबाबत प्रचंड उत्साहात आहे. मात्र, तिच्या वडिलांनी तिला होळीसाठी मेरठला घेऊन जायचे ठरवल्यामुळे सगळेच कठीण झाले आहे. आपल्या वडिलांना पटवण्यासाठी इलायची तिची
अवखळ बुद्धी कशी वापरते हे बघणे प्रेक्षकांसाठी खूप मजेशीर ठरणार आहे.”

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Elaichi and Pancham struggle to celebrate Holi together on Sony SAB's Jijaji Chhat Per Hain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.